१०० पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळेसाठी ३ अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण होणार

A permanent cadre of 3 part-time directors will be created for schools with a student population of more than 100.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण

 

असे देण्यात येणार मानधन

अंशकालीन निदेशकांना ४८ तासिकांच्या अध्यापनाकरिता १२ हजार रूपये मानधन देण्यात येईल. त्यांनी ४८ तासिकांपेक्षा अधिक काम केल्यास २०० रूपये प्रती तासिका याप्रमाणे १८ हजार रूपयांच्या मर्यादेत मानधन देण्यास मान्यता देण्यात आली. अंशकालीन निदेशकांव्यतिरिक्त अन्य तज्ञांची सेवा २०० रूपये प्रती तासिका घेण्यास या दराने घेता येणार आहे.

बुलढाणा न्यूज Buldhana News

मुंबई Mumbai – महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास आज मंगळवार, २७ मे २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Devendra Fadnavis होते.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अंशकालिन निदेशकांची नियुक्ती, मानधन, शैक्षणिक पात्रता आणि कायम संवर्ग निर्मिती याबाबत आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांच्या नियुक्तीसाठी कायम संवर्ग निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. The Cabinet meeting held today approved the creation of a permanent cadre for the appointment of part-time directors in upper primary schools in self-governing institutions. यानुसार १०० पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळेसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव Arts, sports and work experience विषयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण केला जाईल.

अंशकालिन निदेशकांच्या मानधनाबाबत समग्र शिक्षा योजनेमध्ये तरतूद आहे. ही योजना ३१ मार्च, २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अंशकालिन निदेशकांच्या मानधनापोटी येणार्‍या पुढील दहा महिन्यांसाठीच्या ८५ कोटी ८० लाख रूपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें