बुलडाणा भाजपची आज राजे गार्डनमध्ये जिल्हा कार्यशाळा

कार्यशाळेस अमरावतीचे प्रा.दिनेशजी सूर्यवंशी करणार मार्गदर्शन

बुलढाणा / प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभरात भाजपा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती त्रिशताब्दी महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजमाता अहिल्यादेवी ह्या एक उत्तम शासक व राज्यकर्त्या होत्या, हिंदू धर्मियांच्या मंदिरासाठी जिर्णोद्धार व सरंक्षणाचे मोठे कार्य त्यांनी केलेले आहेत. महिलांसाठी त्या एक आदर्शच आहेत. त्यांच्या कार्याचा इतिहास अधिक विस्तृतपणे जगासमोर यावा, यासाठी प्रदेश भाजपा कडून विविध उपक्रम व कार्यक्रमाचे नियोजन केल्या जात आहे. या निमित्ताने स्थानिक राजे गार्डन येथे जिल्हा भाजपची कार्यशाळा नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होत आहे.

या कार्यशाळेस अमरावती येथील भाजपा नेते प्रा.दिनेशजी सूर्यवंशी हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहे. याशिवाय कार्यशाळेला आ.श्वेताताई महाले पाटील, माजी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, मा.खा.सुखदेवजी काळे, माजी आमदार तोतारामजी कायंदे, भाजपा जिल्हा महामंत्री, भाजपा जिल्हा पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य,आजी माजी आमदार/खासदार जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष ई ची उपस्थिती असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें