What did Dr. Babasaheb do? How did the chest swell to tell? But what have we learned from it: Babasaheb Jadhav
संभाजीनगर (औरंगाबाद)- येथील कांचनवाडी भागातील राजव्हॅली व साईराजव्हॅली ईलीड सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.६ डिसेंबर रोजी ६८ व्या महापरिणीर्वाण दिनानिमीत्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी परिवहन विभागातून सेवानिवृत्त बाबासाहेब जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जीवनात जर यशस्वी व्हावयाचे असेल तर प्रत्येकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन प्रत्यक्षात आचरणात आणावयास पाहीजे तोच व्यक्ती आणि तोच समाजप्रगती पथावर जाऊ शकतो नुसती भाषणबाजी करावयाची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले? कसे केले? हे छाती फूगून सांगतील… पण त्यातून आम्ही आपण काय शिकलो? ते मात्र कोणीच सांगत नाही. तसे पाहिले तर आपण स्वत: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे तसे वागा व नंतर इतरांना सांगा हाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रध्दांलजी ठरेल असे विचार बाबासाहेब जाधव यांनी महारिनिर्वाण दिनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत आरोग्य अधिकारी आशा भोगे होत्या. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी अॅाफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव होते. सर्वप्रथम डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेनबत्ती अगरबत्ती, पुष्पानी पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्तावीक संभाजीनगर औरंगाबाद मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्सपेक्टर (एपीआय) अनिल कंकाळ यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आयकर सहाय्यक अयुक्त शुभांगी कंकाळ यांनी १८९१ पासून ते १९५६ पर्यंतच्या जीवन प्रवासात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या व देशाच्या विकासासाठी काय काय केले यावर प्रकाश टाकला. तर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विमल जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर व स्रियांना संविधानाव्दारे कोणकोणते अधिकार दिले. यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी दिपाताई कंकाळ, बँक मॅनेजर अंकीत भोगे, मुकुंद मिसाळ, डॉ.राणी कंकाळ, विलास मनोहर, सुभाष सूर्यनारायण, मायाताई मिसाळ, हर्षालीताई प्रतिक भोगे, अंसू अनिल कंकाळ, पुनमताई अंकीत भोगे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आदर्श शिक्षक प्रतिक भोगे यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनियर व्दिज अनिल कंकाळ यांनी केले.
कार्यक्रमासाठी सोसायटी मधील बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थीत होते.
काय सांगता? समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या बदलीचा मार्ग सुकर, शासन निर्णय निर्गमित