आज झालेल्या शपथविधी वेळी सर्वांनी आईचे नाव का घेतले?

Why did everyone take the mother’s name during the swearing-in today?

मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणविस, उपमुख्यमंत्रीपद एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार


प्रवीण थोरात / ९८८ १५६३ ९८८

       बुलडाणा:  विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर झाला. यावेळी विधानसभेत जनतेने थोडे थोडके नव्हे तर तब्बल २३५ जागांचे यश महायुतीच्या झोळीत टाकले. परंतु महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा मिळाल्या. त्याचवेळी सरकार पुन्हा येईन म्हणणारे पुन्हा येतील हे निश्चित झाले होते. परंतु मध्यंतरीच्या (८-९) दिवसात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेण्याकरिता तयार नव्हते. राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर आज गुरुवार, दि.५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर उपमुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी शपथ घेतली. यावेळी शपथविधी समारोहात एक विशिष्ट बाब चर्चील्या गेली ती सर्वांनी आपल्या-आपल्या आईचे नाव शपथविधी वेळी का घेत होते.
सर्वांना प्रश्न पडला होता की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणविस यांनी आईचे नाव घेतले त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार या दोघांनी देखील आईचे नाव शपथ घेतेवेळी जोडले होते.


आईच्या नावामागचे कारण शोधले असता असे दिसले की, शासकीय कागदपत्रांमध्ये आता वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव लावणे देखील बंधनकारक करण्यात आले आहेे. याबाबत ११ मार्च २०२४ च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचे नाव येईल. म्हणजेच सुरूवातीला बालकाचे नाव, त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव याप्रमाणे. महसूल, शासकीय कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे, विविध परीक्षा यासर्वांमध्ये हा नियम लागू करण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आईचे नाव टाकण्यासाठी मंजुरी देण्यात आली. शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळेच शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून केली होती. त्यामुळेच यासर्वानी आपल्या नावासोबत आईचे नाव जोडल होते.

     एका कवीच्या ओळी आठवल्या ….

   मुंबईत घाई
     शिर्डीत साई, फुलात जाई
       गल्लीगल्लीत भाई
        पण जगात भारी
          केवळ आपली आई…!

जगभरात आयुष क्षेत्राचा स्वीकार वाढत आहे: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

प्रवाश्यांचे बोथा घाटात चल यार धक्का मार

जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री बंद? मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु

भारतीय जनता पार्टीच्या बुलडाणा जिल्हा चिटणीस पदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें