गावा-गावात जावून रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार-  माजी आमदार राहुल  बोंद्रे 

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल  बोंद्रे यांनी फुंकले रणशिंग

गावा-गावात जावून रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार-  माजी आमदार राहुल  बोंद्रे 

Former MLA Rahul Bondre will go from village to village and give the statement of blood signatures to the Governor

चिखली :   शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज नाही, महागाई प्रचंड वाढत असून दररोज ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या मागण्यांचे रक्ताचे निवेदन पोलीस प्रशसानाने फाडणे म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नाही. या निष्ठूर सरकरारच्या विरोधात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सावरगाव डुकरे येथे आम्ही सुरु केले. आमच्या आंदोलनाला विरोध म्हणून विरोधकांनी सावरगाव डुकरे येथेच आंदोलन सुरु केल्याने गावातील सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असून गावा- गावात जावून १ लाख रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार असल्याचे रणशिंग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल  बोंद्रे यांनी फुंकले.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते जेलमध्ये जायला भीत नाही – श्यामभाऊ उमाळकर

बुधवार २५ सप्टेंबर रोजी माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते राहुल बोंद्रे व शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे बोलत होते.  जगाचा पोशिंदा जीवन संपवण्याच्या विंवचनेत असतांना सरकार त्यांच्या मागण्यांवर चर्चा करत नाही. शेतकऱ्यांनाच लुटायचे अन् त्यांना लंगोटी दान करायची असे महायुती सरकारचे धोरण असल्याचेही राहुल बोंद्रे यांनी सांगितले. अन्नत्याग आंदोलन सोपी गोष्ट नाही, शेतकऱ्यांप्रती राहुल बोंद्रे यांच्या मनात आस्था आणि तळमळ असल्यामुळे ते करु शकले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते जेलमध्ये जायला भीत नसल्याचे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर म्हणाले.   या आंदोलनात राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह सदुनाना ठेंग, अंबादास चिंचोले, शिवराज पाटील, जगन्नाथ पाटील , शैलेश सावजी, मनोज लाहूडकर सुधीर पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन माजी मंत्री तथा काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते सोडवण्यात आले.

शेतकरीच आता सरकार बरखास्त करतील : माणिकराव ठाकरे

Farmers will now dismiss the government: Manikrao Thackeray

शेतकऱ्यांच्या मागण्यांना केंद्र व राज्य सरकारकडे किंमत नाही. सरकार शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारत नाही, संवेदानाशून्य सरकराला शेतकरीच बरखास्त करतील, असा हल्लाबोल माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांच्या रक्तांच्या सह्यांचे निवेदन पोलीस फाडतात याच्या मागे कोण आहे, हे पाहिले पाहिजे, राहुल भाऊ बोंद्रे यांच्यामागे शेतकऱ्यांचा मोठा जनआशिर्वाद आहे. ते सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतात, त्यांची अनेक आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचेही काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

बँकेचा प्रश्न आमदार ताई विधानसभेत का मांडत नाही :  मनोज लाहूडकर

आमदार ताई यांनी शेतकऱ्यांप्रती असणारी तळमळ विधानसभेत मांडावी. चिखली विधानसभा मतदारसंघात जिल्हा केंद्रीय बँकेचा प्रश्न  उपस्थित करणाऱ्या आमदार ताईंनी पाच वर्षात  हा प्रश्न सभागृहात एकदाही का मांडला  नाही? असा सवाल उदयनगरचे सरपंच मनोज लाहूडकर यांनी केला. लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न या आयुधाद्वारे त्या विधिमंडळात आक्रमक का झाल्या नाहीत ? फक्त वैयक्तिक राहुल भाऊ बोंद्रे यांना विरोध म्हणून प्रति अन्नत्याग आंदोलन सावरगाव डुकरे मध्ये करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

बी.ए.एम.एस डॉक्टर आता कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून होणार रुजु : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारच्या विरोधात (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें