शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारच्या विरोधात (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे : जालिंधर बुधवत


           बुलडाणा : राज्यातील निष्ठूर सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने आक्रोश मोर्चा आज सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. या मोर्चासाठी मशाल जागर यात्रा देखील बुलडाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगाव पिंजून करण्यात आली.
         या आक्रोश मोर्चात बुलडाणा विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी स्थानिक जिजामाता प्रेक्षागार जवळील टिळक नाट्य मंदिर बुलडाणा येथे सकाळी ११ वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जालिंधर बुधवत जिल्हाप्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी केले आहे.
 

            सत्ता व धनशक्तीला जनशक्तीची ताकद दाखवू चला एकजूट होऊ.. मशाल पेटवू या म्हणी प्रमाणे शेतकर्‍यांच्या मुद्यावर एकत्र येऊन सोयाबीन- कापसाचे भाव काय आहेत? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतकर्‍यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी आज २३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्‍या मोर्चाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.

सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश

देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

शेतकर्‍यांच्या हितासाठीच शिवसेनेची ‘मशाल जागर यात्रा’

 

शेतकर्‍यांच्या हितासाठीच शिवसेनेची ‘मशाल जागर यात्रा’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें