भगव्या झंझावातात मोताळ्यातून मशाल यात्रेला प्रारंभ
निवडणुका येतील निवडणुका जातील शेतकरी जगला पाहिजे : जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत
बुलडाणा: भाजप-शिंदे गट सरकारच्या पायाखालची वाळू तशीच घसरली आहे. केवळ घोषणा करण्यात पटाईत असलेले राज्यकर्ते योजनांच्या भूलथापा देत आहेत. आज शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पीक विम्याचे मागच्या वर्षीचे पैसे अद्याप मिळालेले नाही. अतिवृष्टीने याच तालुक्यात होत्याचे नव्हतं केल आहे. पण यांना शेतकरी मायबापांशी काहीही सोयरसुतक नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना कुठल्याही कागदपत्राविना थेट दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी केली होती. शिंदे – फडणवीसांची योजना म्हणजे लबाडा घरचा आवतनच एक प्रकारे आहे. आमची मशाल यात्रा ही मायबाप शेतकर्यांच्या हितासाठीच सुरू आहे. शिवसेना ही निवडणुकीसाठी कायमसज्ज असते. निवडणुका येतील निवडणुका जातील पण शेतकरी जगला पाहिजे त्यासाठी हा आमचा आक्रोश मोर्चासाठी जागर सुरू असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले.
मोताळ्यातून या यात्रेचा शेतकरी बांधवांच्या व शिवसैनिकांच्या उपस्थितीत श्री गणेशा करण्यात आला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन ही मशाल यात्रा जागर करणार आहे. त्यानंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हिताच्या मागण्यांसह विविध प्रश्नांवर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा धडकणार आहे.
यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले की, शिवसेना ही कायमस्वरूपी समाज हितासाठी काम करते. निवडणुका आल्या म्हणून आम्ही काम करत नाही. हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ८०% समाजकरांनी आणि २०% राजकारणाचा मंत्र दिला आहे. त्यामुळे समाज हित डोळ्यासमोर ठेवूनच आमचं काम सुरू आहे, सुरू राहील. आज मायबाप शेतकरी अडचणीत आहेत. रोजगाराचे प्रश्न आहेत, शेतीमालाला भाव नाहीत. घरात पडून असलेल्या सोयाबीन व कापसाचे काय करायचं ? हा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. त्यामुळे निवडणुका येतील जातील शेतकरी जगला पाहिजे. आणि निवडणुकांचं काय येऊन बसलात, येणार्या विधानसभेची निवडणूक ही जनताच हाती घेणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगून शेतकरी हितासाठी आमचा लढा हा प्राणपणाने सुरू राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी संदीप शेळके, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, रामदास सपकाळ अपंग सेल जिल्हा प्रमुख , तालुका प्रमुख लखन गाडेकर, माजी तालुका प्रमुख वासुदेव बंडे पाटील, युवासेना उप जिल्हा प्रमुख डॉ.अरुण पोफळे, शुभम घोंगटे, किसान सेना ता.प्र.अशोक गव्हाणे, सुधाकर सुरडकर, अपंग सेल ता प्र भागवत शिकारे, तालुका संघटक राजु बोरसे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, आशिष खरात, गणेश पालकर, संजय गवळी, मोहन निमरोट, मोहम्मद सोफियान, अनंता शिप्पलकर, मुकुंदा शिरसागर, किरण हुंबड, संजय रोढे, विष्णू पाटील, निलेश पाटील, राजु सुरडकर , गजानन कुकडे, गुलाबराव व्यवहारे, भास्कर शिंदे, सुधाकर आघाव, शेषराव सावळे, रवी गोरे,समाधान बुधवत, अमोल बुधवत, मधुकर महाले, बाळासाहेब सिनकर, राहूल जाधव, प्रवीण राजपूत, चंद्रसिंग साबळे, दगडू पाटील, दिलीप शेळके, संतोष निंबाळकर, दत्ता सपकाळ, आकाश दांडगे, निर्मलकुमार इंगळे, अनंता पाटील, राजू झुंजारके, सुनील गुंडकर, अमोल नखोद, अनिल कानडजे, यांचे सह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची कीड – प्रा. नरेंद्र खेडेकर
महायुती सरकारच्या कामामुळे शेतकरी, शेतमजूर नागावला गेला. सुशिक्षित बेरोजगारांना कुठल्याही प्रकारचा मोठा उद्योग मिळाला नाही. उलट ते गुजरात कडे पळाले. लाडका भाऊ म्हणून केवळ गाजर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात शेतीमातीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या संकल्पनेतून ही मशालजागर यात्रा काढण्यात आली आहे. मालवण मध्ये छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे उद्घाटन झालं होतं. पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळल्यासारखा आहे. केवळ आणि केवळ भ्रष्टाचारातूनच हे झाल आहे. मुलीं सुरक्षित नाहीत, शेतमालाला भाव नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश आहे. हा आक्रोश शासनाला कळावा म्हणूनच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या जनजागरासाठी ही यात्रा असल्याचे यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले. मोताळा येथून सांगळद, तिघ्रा ,आडविहीर या नियोजित मार्गाकडे मशाल यात्रा पुढे रवाना झाली.
शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर- जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके
देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्यास पकडले
सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश