शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर- जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके

शासनाने शेतकर्‍याचे अंत पाहू नये

              बुलढाणा न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये शेतकर्‍याचे उत्पन्न सन २०२० पर्यंत दुप्पट करण्याच्या आश्वासन दिले होते. उत्पादन खर्च मात्र दुपटीपेक्षा जास्त झाला व शेतमालाचे भाव होते त्यापेक्षा कमी झाले. बड्या उद्योगपत्यांना फायदा होण्यासाठी आयात निर्णयात धोरणाच्या माध्यमातून शेतमालाचे भाव केंद्र शासनाकडून हेतूपुरस्कार पाडल्या जातात, त्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, सन २०२३ २४ च्या खरीप व रब्बी पिकाचे पीक विमा प्रकरणे मोठ्या प्रमाणात कंपनीने नामंजूर केले आहेत शासनाने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पीक विमा देण्याबाबत निर्णय घ्यावा असे मत नरेश शेळके जिल्हा कार्याध्यक्ष यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने  दिनांक ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या नियोजनाच्या वेळी केले.

    

          निवेदनामध्ये म्हटले की,  केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाचे सर्व भाव वाढले गेले. सोयाबीनला किमान १०हजार  व कापसाला १५ हजार प्रतिक्विंटल भाव मिळण्याबाबत शासनाने धोरण ठरवावे. सन २०२३ २४ च्या खरीप व रब्बी पिकाचे पीक विमा प्रकरणे मोठ्या प्रमाणात कंपनीने नामंजूर केले आहेत शासनाने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पीक विमा देण्याबाबत निर्णय घ्यावा. यावर्षी पिक विमा कंपनीने ई पीक पाहणीची वाट घातली आहे, अनेक शेतकर्‍यांना पीक पाहणी करणे शक्य नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू शकतात त्याकरिता ई पीक पाहणी अट तत्काळ रद्द करावी.

अतिवृष्टीमुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी २५००० रुपये मदत जाहीर करावी . केंद्र व राज्य शासनाने सुलतानी व अस्मानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍याला वाचविण्याबाबत येत्या दहा दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतल्या जातील व याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील.

   निवेदनामध्ये कार्याध्यक्ष नरेश शेळके सह जिल्हा महासचिव बीटी, जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पी एम जाधव, भगवानराव शेळके, सय्यद इक्बाल,  तालुका अध्यक्ष तुळशीराम दादा काळे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर ,शहर कार्याध्यक्ष सत्तार कुरेशी, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राजेश गवई, जिल्हाप्रवक्ता सुजित देशमुख ,ह भ प शंकर महाराज, सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद घोंगे, पंजाबराव राऊत, विठ्ठल वाघमारे ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष गजानन भिवसनकर, समाधान जाधव , ज्ञानेश्वर शेळके ,विनोद गवई, साहेबराव शेळके, राजू गवई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहिर करा :  अ‍ॅड.जयश्री  शेळके

सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश

 

एस.टी.कामगारांच्या संपाला शिवसेना जिल्हा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पाठिंबा – जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें