बुलढाणा न्यूज – महाराष्ट्र एस.टी.कामगार संयुक्त कृती समितीचे कर्मचारी यांच्या वतीने विविध मागण्यासाठी बुलडाणा येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी भेट दिली.
शासनाने लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात लागु केली. लाडकी लालपरी ही योजनाही लागू करून एस.टी.कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांच्या प्रमाणे वेतन देण्यात यावे. या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर पाठिंबा असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण शक्तिनिशी आपल्या सोबत असल्याचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी उपस्थित कर्मचारी बंधू आणि भगिनींना सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन माने, उप तालुका प्रमुख ओमप्रकाश नाटेकर यांच्यासह एस.टी.कर्मचारी बंधु आणि भगिनी उपस्थिती होत्या.
मराठा सेवा संघ केवळ एक संघटन नाही तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांसाठी विचाराची शिदोरी- डॉ.बालाजी जाधव
सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश