नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहिर करा :  अ‍ॅड.जयश्री  शेळके

Announce financial assistance to the loss-affected farmers: Adv. Jayashree Shelke

प्रदेश काँग्रेसच्या सचिव अ‍ॅड.जयश्री शेळके यांची तहसिलदार यांच्याकडे मागणी

          बुलढाणा न्यूज – मोताळा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या शेतमाल नुकसानीची पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने आर्थिक मदत जाहिर करावी, अशी मागणी State Congress Secretary Adv. Jayashree Shelke प्रदेश काँग्रेसच्या सचिव अ‍ॅड.जयश्री शेळके यांनी तहसीलदार मोताळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   

 मोताळा तालुक्यात सतत पाऊस सुरु आहे. यामुळे कपाशी, सोयाबिन, मका, मूग, उडिद या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने या सर्व पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यामुळे शेतमालाचे नुकसान होऊन शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे.

     वाढलेली महागाई, निसर्गाचा प्रकोप, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. शेतीची मशागत, पेरणी, खत-बियाणे तसेच अनेक वेळा दुबार पेरणी करावी लागते यातच शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. एवढं करुनही शेतमाल विकून मुबलक पैसा हातात येईलच याची शाश्वती नसते. मागील वर्षीच्या नुकसानीची मदत शेतकर्‍यांना मिळाली नाही तसेच मोठ्या प्रमाणात ज्यावेळी शेतकरी बांधवांनी आंदोलन केले त्यावेळी पिक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना देण्यात आली. त्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले अनेक शेतकरी बांधव अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत. आधीच शेतमालाल भाव अपेक्षित बाजारभाव मिळत नाहीत. सोयाबिनचे बाजारभावही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आताही कापणीवर आलेल्या पिकाचे मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे.
   

     तसेच शासनाने ई पीक पाहणीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली असूनही अनेक वेळा तांत्रिक अडचणी येतात. बर्‍याचदा साईट बंद असते त्यामुळे नुकसान होऊनही पीक पाहणीची नोंद घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाही. बहुदा पिक पाहणीचा सर्व्हे करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली जाते. संबंधित एजन्सीमार्फत अनेकदा योग्य पद्धतीने ई पीक पाहणी केली जात नाही. त्यामुळे आपल्या स्तरावरुन नुकसानीचा सर्व्हे करुन शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत देणे अत्यावश्यक आहे. तरी आपण आपल्या स्तरावरुन प्रशासनाला मोताळा तालुक्यातील नुकसान पाहणीचे आदेश द्यावेत व नुकसानग्रसस्त शेतकर्‍यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावीअशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव अ‍ॅड.जयश्री शेळके यांनी तहसीलदार मोताळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, मा.जि.प.सभापती एकनाथ खर्चे, नगरसेवक सलिम चुनीवाले, नगरसेवक जलिल खा, सुनिल पाटील, आनंदा खरे, अनिल पाटील, प्रदिप पाटील, उडन जमदार, सुरेश फाटे,विनोद ढोण, सोपान पानपाटील, शुभम सरोदे, काशिनाथ बिचकुले, गजानन डोंगरे, शेषराव पाटील, दुर्गा तायडे, रुपाली शिराळ, सविता शिराळ, प्रमिला अंभोरे, ज्योती संबारे, मंदा सुर्यवंशी, निता तायडे, जयश्री सावळे, अलका बांगर, केशर अहिरे, विद्या अहिरे, वर्षा अहिरे, सविता जवरे, पंचशिला अहिरे, पंचफुला अहिरे, सुशिला अवचार, संजय रबडे, मनोहर जवरे, विलास ठाकरे, ज्ञानेश्वर जवरे, निखील शिंबरे, ज्ञानेश्वर जवरे, अक्षय जवरे, भारती कोल्हे, शालिनी खराटे, सविता अहिरे, अरुणा महाजन, सरला बिचकुले, अक्षय महरुन, योगेश पैसोडे, मंगेश जाधव, राजेश गवई, प्रशांत राजपूत, कार्तिक सवडतकर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

मराठा सेवा संघ केवळ एक संघटन नाही तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांसाठी विचाराची शिदोरी- डॉ.बालाजी जाधव

 

सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश

देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें