सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश

Retired Joint Secretary Siddharth Kharat’s Uddhav Balasaheb Thackeray’s (Ubatha) official entry into Shiv Sena
बुलढाणा न्यूज – शिव-शाहू,फुले, आंबेडकर चळवळ तसेच संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या विचार पेरणारे वारकरी संप्रदायाचा पाईक सेवा निवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी मंगळवार, दि.३ सप्टेंबर २०२४ रोजी शेकडो शिवसैनिक सोबत घेऊन मातोश्रीवर पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते खांद्यावर भगवा घेऊन हाती शिवबंधन बांधून घेत उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात प्रवेश घेतला आहे.
              या प्रवेशाप्रसंगी पश्चिम विदर्भ प्रमुख मा.खा.अरविंद सावंत,मा.खा. विनायक राऊत मा.आ.मिलींद नार्वेकर, बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, बाळापुर  विधानसभेचे आमदार नितिनबापू देशमुख, उपजिल्हाप्रमुख आशिष राहटे, छगनदादा मेहेत्रे, घाटाखालील जिल्हाध्यक्ष वसंतराव भोजने, जिल्हा संघटक बद्री बोडखे, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, डॉ.जानुजी मानकर, मेहकर नपचे माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, गजानन मोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.सुमित सरदार, जीवन घायाळ, साहित्यिक रोहित म्हस्के, जिवन घायाळ, उर्मिला ठाकरे, देऊळगाव माळीचे ए.एन.बळी, गजानन पालवे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
 
         यावेळी सह सचिव सिद्धार्थ खरात यांनी नुकताच सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली असून मेहकर लोणार विधानसभा निवडणुक लढण्याची त्यांची इच्छा असल्याचे कळते.

मराठा सेवा संघ केवळ एक संघटन नाही तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांसाठी विचाराची शिदोरी- डॉ.बालाजी जाधव

 

देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें