स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पिस्टल १, जिवंत काडतुसे ५ असा एकूण ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा न्यूज : येत्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, विधान सभा निवडणूक २०२४, राजकिय व सामाजिक क्षेत्राशी निगडीत विविध आंदोलनं यांचे पार्श्वभूमिवर जिल्ह्यामध्ये शांतता राहून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बुलढाणा पोलीस दलाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले पोलीस स्टेशन त्याच बरोबर जिल्हा व तालुका मुख्यालय या व ईतर ठिकाणी देशी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल), काडतुसे व ईतर हत्यारांची तस्करी, खरेदी-विक्री करणारे तसेच असे घातक शस्त्र जवळ बाळगणार्या ईसमांचा मुद्देमालासह शोध घेवून, त्याचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते. सदर संबंधाने वपोनि. माधवराव गरुड, पोनि. अशोक एन. लांडे यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदारांची विवीध पथके तयार करुन, त्यांना अवैध देशी बनावटीची पिस्टले, काडतूस बाळगणार्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचित केले होते.
याबाबत हकीकत अशी की, दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ एक तीस वर्षी मुलगा येणार असून त्याचे जवळ देशी पिस्टल व जिवंत काडतूसे आहेत. यावरुन स्था.गु.शा.चे पथकाने बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ सापळा रचून, यातील आरोपीस पकडले. पोलीसांनी पकडलेल्या आरोपीची पंचां समक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ देशी बनावटीचे एक अग्नीशस्त्र (पिस्टल) मॅग्झीनसह किंमत ४०,०००/-रुपये., जिवंत काडतूस एकूण पाच नग किंमत प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे एकूण पाच हजार रुपये असा मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणी पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण येथे कलम ३/२५ भारतीय अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आरोपी शेख वसीम शेख रऊफ वय ३०, रा. देऊळघाट ता.जि. बुलढाणा ह.मु. कटकट गेट डिपीजवळ, छत्रपती संभाजीनगर याचेकडून एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल. जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात देशी पिस्टल आणि काडतूसे खरेदी-विक्रीशी संबंधीत ईसमांचा शोध घेण्यात येत असून, त्या करीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. सदर प्रकरणी, पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण येथे शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुढील तपास पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण यांचे कडून करण्यात येणार आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक
सदरची कामगिरी श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. अशोक थोरात अपोअ खामगांव, श्री.बी.बी महामुनी- अपोअ बुलढाणा यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, वपोनि. श्री. माधवराव गरुड, पोनि. श्री. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी, सपोनि. रुपेश शक्करगे, सफौ. गजानन माळी, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, पोहेकॉ. जगदेव टेकाळे, पोना. गणेश पाटील, पोना. संजय भुजबळ सर्व नेमणूक- स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.
मराठा सेवा संघ केवळ एक संघटन नाही तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांसाठी विचाराची शिदोरी- डॉ.बालाजी जाधव
माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन