सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकर करणार बुधवारपासून आंदोलन
बुलढाणा न्यूज : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सोयाबीन-कापूस प्रश्नी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलन उगारले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने मंगळवार, ३ सप्टेंबर पर्यंत ठोस निर्णय घेतले नाही, तर बुधवार ४ सप्टेंबर पासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलना सुरुवात करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली.
सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलने करीत आहोत, पण सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे आमचा हा शेवटचा अल्टिमेटम असून, जर सरकारने ठोस निर्णय घेतले नाही तर मात्र ४ सप्टेंबर पासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मग मात्र ते सरकारला जड जाईल असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. 31 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉ.ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, सदाशिव जाधव, अनिल पडोळ, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे, राम अंभोरे, अविनाश डुकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव निमित्ताने तीन दिवस ज्ञानेश्वरी व्याख्यान