बुलढाणा: कृषी महाविदयालय, अकोलाच्या विद्यार्थिंनी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा मार्फत माळविहीर येथे कीटकनाशक हाताळणीचे व फवारताना घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिक सादर केले. एकात्मिक कीड व्यवस्थापनात किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा महत्वाचा वाटा आहे. मात्र, ही कीटकनाशके विषारी असून, हाताळणी आणि फवारणी करतांना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
याप्रसंगी विदयार्थिंनी कीटकनाशक हाताळतांना आणि फवारणी करतांना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गमबुटचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले. तसेच कीटकनाशकाचे द्रावण कसे तयार करावे, फवारणी करतांना पंपाच्या विशिष्ट दाबा व वेग याबाबतही आरती देशमुख, अनुजा जगताप, प्रांजल सुर्वे, नेहा वानखेरे आणि मृणाल वानखेडे या विदयार्थिंनी केंद्र प्रमुख डॉ. जगदीश वाडकर आणि कृषी सहायक स्वाती नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांमध्ये या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण होईल आणि विषबाधेच्या घटना कमी होतील, अशी अपेक्षा कृषी सहायक स्वाती नेमाने यांनी व्यक्त केली.