बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव निमित्ताने तीन दिवस ज्ञानेश्वरी व्याख्यान

प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान
बुलढाणा अर्बन कर्मचार्‍यांसाठी वृक्षारोपण वृक्ष लावा बक्षीस मिळवा

              बुलढाणा:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा परिवाराकडून बुलढाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली असून गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जात आहे, यामध्ये दि.१४ ते १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा गोवर्धन ईमारतच्या सभागृहात ज्ञानेश्वरी वरील व्याख्यान प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे या़चे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी तीन दिवसीय व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
           

                बुलडाणा अर्बन मुख्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या मंडपात दि.७ सप्टेंबर रोजी श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. तर८ सप्टेंबर रोजी सकाळी अर्थवशिर्ष पठण होणार आहे. दि.९ सप्टेंबर रोजी कर्मचारी करा ओके गायन स्पर्धा होणार असून १३ सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा गोवर्धन ईमारतच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. दि.१३ सप्टेंबर रोजी दुपारी गोवर्धन ईमारत च्या सभागृहात कर्मचारी महिलांसाठी एक मिनिट हि स्पर्धा होणार आहे.दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी गोवर्धन ईमारतच्या सभागृहात महिला भजन स्पर्धा होणार आहे.

        यावेळी मागील वर्षी प्रमाणे यंदाही कर्मचार्‍यांसाठी वृक्षारोपण वृक्ष लावा बक्षीस मिळवा या धरतीवर वृक्षारोपणचे वाटप करण्यात येणार आहे. दि १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा आनंद मेळावाने गणेशोत्सवाचा समारोप होणार आहे. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश चेकेटकर व सचिव प्रशांत काळवाघे व गणेशोत्सव मंडळ कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

परिवहन महामंडळात युवा कार्य प्रशिक्षण योजनेत संधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें