बुलढाणा (जिमाका) :जिल्हा होमगार्डची सदस्य नोंदणी करण्यात आली. यात आता दि. २७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानात ही चाचणी होणार आहे.
जिल्ह्यातील २४८ होमगार्ड सदस्य नोंदणीकरीता १२ हजार ७६२ पुरुष, तर १ हजार ५५२ महिलांनी ऑनलाइन अर्ज केले आहे. या सर्व उमेदवारांनी आवेदन क्रमांकानुसार ठरवून दिलेल्या दिवशी सकाळी ६ वाजता मुळ आवेदनपत्र व कागदपत्रासह उपस्थित राहावे लागणार आहे.
महिला उमेदवार वगळून आवेदन क्रमांक ०१ ते २८५० दि. २७ ऑगस्ट, २८५१ ते ५७०० दि. २८ ऑगस्ट, ५७०१ ते ८५५० दि. २९ ऑगस्ट, ८५५१ ते ११४०० दि. १ सप्टेंबर, ११४०१ से १४२२८ दि. २ सप्टेंबर आणि सर्व महिला उमेदवार दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. सदर तारखेस पाऊस आल्यास किंवा अडचणी आल्यास तारखेत बदल करण्यात येणार आहे.
सर्व महिला उमेदवारांनी दि. ३ सप्टेंबर रोजी मैदानी चाचणी करिता सकाळी ६ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन होमगार्ड समादेशक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.