वामनदादा कर्डक सांस्कृतिक व वैचारिक प्रेरणा केंद्र ठरेल

आ.संजय गायकवाड यांचे प्रतिपादन, वामनदादा कर्डक यांच्या 102 वी जयंती

बुलढाणा ; डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचा विचार समाजाला दिला,माणुसकी शिकवली.हाच विचार माणसांच्या मनामनात पेटवत जिवंत ठेवण्याचे काम महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनकारी गीतांमधून केले.अशा वामनदादा कर्डकांचा पुतळा व परिसर सर्व समाज आणि कलावंतासाठी सांस्कृतिक व प्रेरणा केंद्र ठरेल असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले. 

       येथील हुतात्मा स्मारक परिसरात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त गुरुवार 15 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.शहरातील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्यवतीने आयोजित कार्यक्रमाच्या सभास्थानी शाहिर डी आर इगळे,सचिव साहित्यिक सुरेश साबळे,माधवराव हुडेकर,पत्रकार अजय बीलारी,शहर अध्यक्ष गजानन दांदडे,जि प माजी सभापती दिलीप जाधव,नागसेन सावदेकर,शिवसेना पदाधिकारी अशोक इंगळे,राहुल कासारे, अमोल खरे,कुणाल पैठणकर,वैशाली ठाकरे,प्रशांत जाधव इत्यादीसह विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते.   

            सर्वप्रथम जयंतीनिमित्ताने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्प व पुष्पमाला अर्पण केल्यावर महापुरुषाच्या प्रतिमाचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले.     यावेळी  आमदार संजय गायकवाड यांना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानद्वारा सन्मानपत्र,फेटा देऊन विशेष गौरव करण्यात आला.सन्मानपत्राचे वाचन आणि शब्दांकन नाट्यकर्मी शशिकांत इंगळे यांनी केले.  शाहिर डी आर इंगळे यांनी मनोगतात लोक कलावंतासाठी वामनदादा कर्डक आर्थिक विकास व कल्याणकारी मंडळाची मागणी केली.तर सचिव तथा साहित्यिक सुरेश साबळे यांनी वामनदादा कर्डक यांचे समग्र साहित्य महाराष्ट्र शासनाने साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित करावे.राज्याच्या विविध विद्यापीठात महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावेत आणि शालेय व विद्यापीठ अभ्यासक्रमात वामनदादा कर्डक यांचे साहित्य समावेश करण्यात यावा अशी मागणी केली.यावेळी पी आर इंगळे,दिलीप जाधव नागसेन सावदेकर यांनीही आपले विचार ठेवले.   आमदार संजय गायकवाड आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि,डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा माणुसकीचा विचार वामनदादा कर्डक यांच्या गीतांनी माणसात जिवंत ठेवला.शहरातील वामनदादाचा पुतळा सांस्कृतिक व वैचारिक प्रेरणा केंद्र ठरेल.त्यांचे समग्र साहित्य शासनाकडून प्रकाशित करण्यासाठी,लोक कलावंताच्या विकास महामंडळासाठी शासनाकडे योग्यवेळी पाठपुरावा करू.शहरातील नाट्यगृहासाठी अधिक 15 कोटींचा वाढीव निधी मंजूर झाला असल्याने नाट्यगृह लवकरच पूर्णतःवास येईल अशी माहिती आमदार गायकवाड यांनी दिली. 

        स्वागत गीत शाहिर डी आर इंगळे आणि संचाने सादर केले, प्रास्ताविक कुणाल पैठणकर तर आभार वैशाली ठाकरेनी केले.                 कार्यक्रमाचे प्रारंभी शहरातील जयस्तंभ चौकातील साहित्य सम्राट, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाभरातून आलेल्या लोककलावंतांनी विविध वेशभूषेत वाद्यासह शाहिरी,पोवाडे गाणी गात अभिवादन रॅलीचे  आयोजन करण्यात आले होते.

        सदर रॅली जयस्तंभ चौक ते हुतात्मा स्मारक परिसरातील महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आली.या रॅलीत विविध कलावंतात वासुदेव,गोंधळ,भारूड कीर्तनकार,नकलाकार,टाळकरी इत्यादीसह इतरही कलावंत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें