Chief Minister Eknath Shinde was sent 65 thousand rakhis by women of Buldana constituency
कृतज्ञता व्यक्त करीत आमदार संजय गायकवाड यांना ही बांधल्या राख्या
बुलढाणा न्यूज- बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महिलांनी स्वयंस्फुर्तीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तब्बल 65 हजार राख्या पाठवल्या आहेत. या राख्या बुलढाणा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या माध्यमातून नुकत्याच पाठविण्यात आल्या.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील महिलांना स्वाभिमानी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजना संदर्भात विरोधकांनी अनेक अफवा उडविल्या होत्या मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या योजनेवर ठाम होते.
तसेच सदर योजना प्रत्यक्षात उतरवून लाखो महिलांना थेट त्यांच्या खात्यात निधी उपलब्ध करुन दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे आपले भाऊच आहेत. या भावनेतून मतदारसंघातील महिलांनी आमदार गायकवाड यांना राखी बांधून त्यांच्याच माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील राख्या पाठवित भावाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मतदार संघातील महिलांनी मानले आभार
महाराष्ट्रातील महिलांना स्वाभिमानी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात आले. अर्ज करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनापूर्वीच त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या भावाप्रमाणेच असल्याचा आदरभाव महिलांनी व्यक्त करत सरकारचे आभार मानले.
https://buldhananews.com/2035/