बुलडाणा : यावर्षीही सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य प्रशासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. यात सन 2024 या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी दि. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हास्तरीय निवड समितीने केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळाना वगळून इतर 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विजेत्या मंडळाला 25 हजारांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या 3 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनुक्रमे रु. 5 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, 1 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे सभागृह, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इ-मेल स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज दि. 31 ऑगस्ट पूर्वी सादर करावेत.
सदर पुरस्कारासाठी निवड स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड निरीक्षणाच्या आधारे करण्यात येणार आह. यात सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धाचे आयोजन प्रत्येकी 2 गुण, गुणांकन 20, संस्कृतीचे जतन, संवर्धन प्रत्येकी 2 गुण गुणांकन 10, राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन 5 गुण आणि राष्ट्रीय, राज्य स्मारके, धार्मिक स्थळाविषयी जनजागरूकता, जतन व संवर्धन 5 गुण असे गुणांकन 10, सामाजिक उपक्रम प्रत्येकी 2 गुण गुणांकन 25, पर्यावरणपूरक मूर्ती गुणांकन 5, थर्मोकोल, प्लास्टिक विरहित पर्यावरणपूरक सजावट गुणांकन 5, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण गुणांकन 5, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा गुणांकन 10, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा प्रत्येकी 2 गुण, गुणांकन 10 असे एकूण 100 गुणांकन देण्यात येतील, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी कळविले आहे.
लंडनच्या डॉ.बाळासाहेब भाला यांच्याहस्ते एडेड हायस्कुल मध्ये वृक्षारोपण