Distribution of school supplies from the profits of Buldana Lumbini Self Help Self Help Group
बुलढाणा न्युज : तथागत भगवान बुद्धांनी या जगाला 2500 वर्षांपूर्वी करूणेचा संदेश दिला, हा करूणा भावच आहे जो मनुष्यामध्ये इतरांना मदत करण्याची भावना निर्माण करतो.
हाच संदेश आपल्या अभंगातून देताना तुकाराम महाराज म्हणतात…
ज्यासी आपंगिता नाही।
त्यासी धरी जो हृदयीं ॥
तुका म्हणे सांगू किती ॥
तोची भगवंताची मुर्ती अर्थात
ज्याला कोणी वाली नाही, काही आधार नाही, अशांना कोणत्याही स्वार्थाविना जो आधार देतो, त्याला आपल्या हृदयी धरतो, त्याच्यावर माया करतो, प्रेम करतो,तोच खरा भगवंत होय. महापुरुषांनी सुद्धा काही कारणास्तव मागे राहिलेल्या समाजाकरीता पे बॅक टू दि सोसायटी अर्थात समाजाचे काही देणे लागते, हि भावना विकसित करण्याचा प्रयत्न केला.
बौद्ध संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्या याच संत आणि महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा एक अल्पसा प्रयत्न म्हणून बुलडाणा येथील लुंबिनी बुद्ध विहाराच्या माध्यमातून जो लुंबिनी स्वयं सहाय्यता बचत गट चालविला जातो. या बचत गटाच्या आलेल्या नफ्यातील काही भाग दरवर्षी गरजू आणि विवंचनेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्यात येत असतो.
आपल्या सर्वांना माहितच आहे की 3 जुलै 1852 रोजी म.ज्योतीबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. याच दिनाचे औचित्य साधून लुंबिनी स्वयं सहाय्यता बचत गटाचे वतीने पाच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जसे की, दप्तर,नोटबुक, कंपास, ड्रेस, बुट, पाणी बॉटल, टिफीन इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
वाटप करण्यापुर्वी उपस्थितांनी बुद्ध वंदना घेवून शेवट सरनतय गाथेने करण्यात आला.
125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या 1 हजार 366 उमेदवारांची शनिवार, 13 जुलै रोजी लेखी परीक्षा