125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या 1 हजार 366 उमेदवारांची शनिवार, 13 जुलै रोजी लेखी परीक्षा

1 thousand 366 candidates qualified for 125 police constable posts on Saturday, July 13, written test
लेखी परीक्षा शनिवार, दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे घेतली जाणार आहे.

बुलढाणा न्यूज : बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन 2022-23 मधील रिक्त असलेल्या 125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा शनिवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिरात घेतली जाणार आहे.
पोलीस दलातील 125 पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण 8 हजार 531 आवेदन अर्ज प्राप्त झाले. यातील 5 हजार 960 उमेदवार प्रत्यक्ष शारीरिक व मैदानी चाचणीस हजर राहिले. या मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण घेऊन 3 हजार 342 उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. यातून प्रवर्ग निहाय 1:10 याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र ठरले आहेत.

          या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सुचना देण्यात आल्या आहेत. पोलिस शिपाई पदाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. 19 जून ते 1 जुलै 2024 या दरम्यान उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांच्या गुणाच्या गुणवत्तेनुसार संबंधीत प्रवर्गातील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणात पात्र असलेले एकूण 1 हजार 366 उमेदवारांची निवडयादी buldhanapolice.gov.in जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील नोटीस बोर्ड आणि पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवारांना 3 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार

बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी 3 तास अगोदर म्हणजेच सकाळी 7 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेश पत्र व स्वतःच्या ओळखीसाठी लगतचा फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड सोबत आणावे लागणार आहे.

        लेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, इलेट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. लेखी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यन्वीत राहणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभन, अमिषाला बळी पडू नये. कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माहिती प्रत्यक्ष अवगत करुन द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

बुलडाणा सैनिक कार्यालयात माजी सैनिकांसाठी मानधनावर भरती

पिंप्री गवळीच्या उबाळे कुटुंबियांनकडून सत्यशोधक विचारांची पेरणी

लंडनच्या डॉ.बाळासाहेब भाला यांच्याहस्ते एडेड हायस्कुल मध्ये वृक्षारोपण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें