Plantation of trees in Aided High School by Dr. Balasaheb Bhala of London
बुलढाणा न्यूज : राष्ट्रीय हरित सेना एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्या वतीने सर्व प्रथम राष्ट्रीय हरित सेनेच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. यानंतर वृक्षांना आळे तयार करणे, परिसरातील वृक्षांची जनगणना, पर्यावरणपुरक नैसर्गिक राखी तयार करणे, शाळूमाती गणपती निर्मिती पर्यावरण पूरक चित्रप्रदर्शनी, निबंध स्पर्धा, वन्यजीव सप्ताह, प्लास्टिक पिशवी बंदी कापडी पिशवी वापर पर्यावरणपुरक दिवाळी या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रमास बेल, आंबा,शिसम, कडूलिंब या प्रजातीचे वृक्ष प्रमुख लंडनचे पाहुणे डॉ.बाळासाहेब भाला हे होते. तर प्रमुख उपस्थितमध्ये डॉ.प्रमोद देशपांडे, डॉ.सौ.देशपांडे, संचालक तो.सी.उबरहंडे, मामा कुळकर्णी, उपप्राचार्य जोशी तसेच इतर मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करुन करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख वनश्री पुरस्कार प्राप्त आर.एन.जाधव यांनी केले होते.
125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या 1 हजार 366 उमेदवारांची शनिवार, 13 जुलै रोजी लेखी परीक्षा