माजी सैनिकांनी राजकारणात येऊन जनसेवा करावी : प्रकाश डोंगरे

Ex-servicemen should enter politics and serve public: Prakash Dongre

       https://buldhananews.com चिखली:   आजी-माजी सैनिकांचा मेळावा रविवार, दि.7 जुलै रोजी श्रीराम नागरी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी युवा सेना उपजिल्हाप्रमुख उबाठाचे प्रकाश डोंगरे बोलत होते.

     पुढे बोलतांना प्रकाश डोंगरे म्हणाले की, सैनिक हा देशाचा रक्षकतर आहेच,परंतु सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा घटक देखील असून हा महत्त्वाचा घटक नेहमीच वंचित राहतो, तो वयाच्या पस्तीसाव्या वर्षात देशाची सेवा करून सेवामुक्त होतो. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. यामुळे माजी सैनिकांनी राजकारणात येऊन जनसेवा करावी असे मत प्रकाश डोंगरे यांनी मांडले. आजी-माजी सैनिकांच्या अनेक समस्या असतात, त्या समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः कटिबध्द असेल, ज्या वेळेस काही अडचणी येतात, त्या सोडविण्याचे आश्वासन सुध्दा डोंगरे यांनी यावेळी दिले.

         या कार्यक्रमाला त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीपभाऊ लगड, भारतीताई लगड, जय सियाराम, श्रीराम झोरे, वसंत गाडेकर, वासुदेव जागृत, राजू अवचार उपस्थित होते. यावेळी आजी-माजी सैनिकांच्या हितासाठी मेहकर मतदार संघात प्रकाशभाऊ डोंगरे यांना जाहीर पाठिंबा देऊन निवडून आणावे, अशी भावनिक साद देखील उपस्थितांना घालण्यात आली.

बुलडाणा सैनिक कार्यालयात माजी सैनिकांसाठी मानधनावर भरती

नव्या जोमाने संघर्ष करु व ईपीएस 95 पेंशनधारकांच्या मागण्या पदरात पाडून घेऊःकमांडर अशोक राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें