वसुंधरा आम्ही तुझे अपराधी…च्या माध्यमातून 2600 देशी वृक्षाची लागवड

बुलडाणा अर्बन परिवाराचा उपक्रम
 
      बुलढाणा न्यूज : बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री.राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी तसेच संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेश झंवर, सौ.कोमलताई सुकेश झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा अर्बन विभाग ग्रामीण एकचे विभागीय व्यवस्थापक श्री.राजेंद्र वानेरे यांनी भाईजींच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. वसुंधरा आम्ही तुझे अपराधी…या माध्यमातून 2 हजार 600 देशी वृक्ष ज्यामध्ये वड, पिंपळ, लिब, जांभूळ, चिंच, आंबा, सिताफळ व इतर वृक्ष लागवड व्हावी याकरिता शाखा डोंगरखंडाळा येथे वृक्षारोपण करण्याकरता डोंगरखंडाळा व परिसरातील गावाकरिता 2 हजार 600 वृक्ष लागवड कार्यक्रम बुलढाणा अर्बन टेक्सटाइल परिसरात घेण्यात आला.

      याप्रसंगी डोंगरखंडाळा शाखेचे स्थानिक संचालक श्री.अनंतराव सावळे, बबनराव उजेड, बबनलालाजी गाडगे (सरपंच), संभाजी राजे विद्यालयाचे संचालक श्यामभाऊ सावळे, प्राचार्य श्री.बरडे सर तसेच त्यांचे शिक्षक वृंद सहकार विद्या मंदिर डोंगरखंडाळ्याचे प्राचार्य श्री.सतीश रोडे सर त्यांचे सर्व शिक्षक वृंद तसेच स्पंनिंग मिलचे व्यवस्थापक श्री.संपत यादव तसेच कर्मचारी, विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री.राजेंद्र वानेरे, शाखा डोंगरखंडाळा शाखा व्यवस्थापक अनिल देशपांडे व कर्मचारी, डोंगरखंडाळ्याचे शाखेचे खातेदार तसेच संभाजी राजे विद्यालय व सहकार विद्या मंदिर डोंगरखंडाळा येथील विद्यार्थी या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता शाखा डोंगरखंडाळा, सहकार विद्या मंदिर डोंगरखंडाळा, डोंगरखंडाळा गोदाम कर्मचारी, स्पिनिंग मिलचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें