बुलढाणा न्युज – येथील चांडक ले आऊट परिसरातील लुंबिनी बुध्दविहार समीतीने व स्थानिक नागरीक व लुम्बीनी महीला बचत गटाने एकत्र येऊन बुलढाणा येथील सुंदरखेड चांडक ले आऊट येथील चिखली रोड वरिल बिल्डींग मध्ये भारत माता अर्बन क्रेडिट सोसायटी बुलडाणा र.नं. 413 स्थापन केली व या शाखेचे सोमवार, दि.1 जूलै 2024 रोजी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे, बुलडाणा जिल्हा शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाकार्यध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव, सुंदरखेड ग्रामपंचायतचे सदस्य कमलेश चंदन, विनोद तळेकर, विजय इल्लरकर, सेवानिवृत्त बँक मॅनेजर विजय गजभिये, गणेश सनांसे, शारदा सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून शाखेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारत माता अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष विजय वानखडे, उपाध्यक्ष सुरेश डवरे,सचिव मोहन जाधव, सहसचिव राजेश्वर भिसे, कोषाध्यक्ष कैलास इंगळे, सर्व संचालक मंडळ यांनी सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे, पत्रकार बाबासाहेब जाधव, बँक मॅनेजर विजय गजभिये व भारत माता अर्बनचे अध्यक्ष विजय वानखडे यांनी रिबीन कापून उद्धघाटन केले. यावेळी पत्रकार, कवियत्री डॉ.मंजूराजे गौतम जाधव यांनी उद्धघाटना प्रसंगी पंन्नास हजाराचे पतसंस्थेत डिपॉझीट दिलेे. महीला बचत गट व परिसरातील नगरीकानी आपआपल्या परिने डिपॅाझिट दिले.
यावेळी रमेश घेवंदे व बाबसाहेब जाधव यांनी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर विजय गजभिये व भारत माता अर्बनचे अध्यक्ष विजय वानखडे यांनी पतसंस्था कोणत्या उद्देशाने स्थापन केली, तीचे उद्देश सांगितले.
यावेळी चांडक ले आऊट परिसरातील सर्व महीला, पुरूष नागरीक यावेळी मोठ्या संख्येने हजर होते. ,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक सुरेश डवरे यांनी केले. यानंतर राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.