बुलडाणा न्यूज – शासकीय रुग्णालयात सतत पाचशे आठवडे दर गुरुवारी भरती असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्यात येते. हा उपक्रम अखंडीत व उत्स्फुर्तपणे सुरु आहे. अन्नदानात सेवा देणार्यांचा सत्कार आमदार श्री. संजय गायकवाड, सौ.जयश्रीताई शेळके, सिध्दार्थ शर्मा, सोहम झाल्टे, उमेश मुंदडा, मधुकर गायके यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रसाद देवून करण्यात आला.
कार्यक्रमाच्यासुरुवातीलस विजय वैद्य, गोपालसिंग राजपूत, संदीप बिलारी, समाधान वावगे, सौ.वाणी रुपराव उज्जैनकर यांनी पाहुण्यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत केले. या प्रसंगी उघड्यावर अन्नदान होत आहे हे पाहून धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी अद्यावत सोयींनी युक्त शेड (निवारा) बांधण्यासाठी 50 लाखांचे सहाय्य करण्याचे घोषीत केले.
बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी अन्नदानाचा हा उपक्रम फक्त गुरुवार पुरता न ठेवता दररोज केल्यास बुलडाणा अर्बन सर्वतोपरी सहाय्य करेल असा संदेश पाठविला. डॉ. सुकेश झंवर यांनी अन्नदानाच्या या महान यज्ञाला शुभेच्छा दिल्या व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आतापर्यंत अन्नदानाच्या 500 आठवड्यासाठी 75 लक्ष रुपये खर्च झाला 10 वर्ष सेवा देणारे सेवेकरी यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरव चिन्ह देण्यात आले.
या सत्कारमुर्तीमध्ये सर्वश्री विजय वैद्य, सुरेश गट्टाणी, रुपराव उज्जैनकर, संदीप बिलारी, सुधीर घगरे, संजय चोपडे, गोपालसिंग राजपूत, लक्ष्मणराव सांगळे, तिलोकचंद चांडक, बजरंग सोनी, नंदकिशोर बोंडे, कुमार कोलवडकर, पांडुरंग क-हाळे, श्री व सौ. वाणी, सुनिल सुर्यवंशी, पांडुरंग फिसके, सुधाकर कांबळे, प्रकाशचंद्र पाठक, राहुल रायपूरे, रमेश पवार, दिलीप राठोड, मनोज राजुरे, अशोक पांचाळ, बाबुराव चव्हाण, गजानन क्षिरसागर, सिध्देश्वर सपकाळ, प्रविण सावजी, गजेंद्रसिंग राजपूत, विजय कुळकर्णी, विनोद चांडक, सईदभाई ठेकेदार, मुरलीधर निनावे, मकरंद जोशी, अली ठेकेदार यांचेसह इतर मान्यवरांचा समावेश होता.
या सर्वांचे गौरव चिन्ह व थैल्या मधुकर गायके गणेश प्रिंटर्स यांच्या सौजन्याने देण्यात आल्या. आमदार गायकवाड, सिध्दार्थ शर्मा, सौ.जयश्री शेळके, सोहम झाल्टे, उमेश मुंदडा व माहेश्वरी युवामंच यांनी उपस्थितांना अन्नदान केले सर्व सेवेकरी उपस्थित हाते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी केले.