बुलढाणा न्यूज: कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईच्या वतीने देऊळगाव राजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार, दि. 19 जून 2024 रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीयर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उप विभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे, मुख्याधिकारी श्री. मोकळ, उद्योजक श्री. मनियार आदी उपस्थित राहणार आहेत. सिंदखेडराजा विधानसभेचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे अध्यक्षस्थानी राहतील. शिबिरात तज्ज्ञ व्यक्तींचे करिअरसंबंधी मार्गदर्शन लाभणार आहेत. शिबिरामध्ये दहावी, बारावीनंतरचे शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारीत रोजगाराच्या संधी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आणि कर्जयोजनेबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी दहावी, बारावी. डिप्लोमा, डिग्री उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, सर्व विद्यार्थी व पालकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.भावले यांनी केले आहे.