बुलढाणाः लोकसभा निवडणुका संपल्या असून आता पुन्हा नव्या जोमाने संघर्ष करुन नवीन सरकार कडून ईपीएस 95 पेंशन धारकांच्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेऊ असे वक्तव्य ईपीएस 95चे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी केले. ते गुरुवार, दि.6 जून रोजी संघटनेच्या सातव्या स्थापना दिनाचे कार्यक्रमात बोलत होते.
संपूर्ण देशात संघटनेचा स्थापना दिवस 6 जून ला साजरा करण्यात आला. संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरामधील जिजामाता स्टेडियम शेजारी या निमित्त ध्वजारोहण व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी 75 वर्षे वरील 3 ज्येष्ठ पेंशनधारक सर्वश्री डी.जे.कव्हळकर मामा, एस.पी.इंगळे तसेच जे.जे.गरकल नाना यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव विरेन्द्रसिंग राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ पी.एन.पाटील यांचे सह कमांडर अशोक राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचलन जिल्हा सचिव श्री.पी.आर.गवई यांनी तर आभारप्रदर्शन महाराष्ट्र सचिव श्री.सुधीर चांडगे यांनी केले.
याच वेळी संपूर्ण देशांत वृक्षारोपण करणे व संघटनेची जिल्हा, तालुका, राज्य कार्यालये स्थापन करणे हा कार्यक्रम सुद्धा हातात घेण्यात आला आहे. बुलढाणा शहरात वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करून हा उपक्रम एक महिना राबविण्यात येणार आहे. तसेच सदर दिवशी मुठ्ठे ले आऊट परिसरात संघटनेचे जिल्हा कार्यालय जिल्हा समन्वयक श्री.अशोकराव दाभाडे यांचे निवासस्थानी सुरु करण्यात आले जेणेकरून जिह्यातील पेंशनधारकांच्या जिल्हा पातळीवरील समस्या तातडीने सोडविणे शक्य होईल.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे नेते बी.एस.नारखेडे, अशोक दाभाडे, एस.एन.बैरवार, महावीर काळे,सौ.सरिताताई नारखेडे, सौ.उषाताई राऊत, विलास पाटील, पी जी.उबरहांडे जगन्नाथ मछले, डी.आर.साळोख, सी.एन.भिसे, ए.आर.सोनोने, आर.एम.पसरटे, जे.आर.दळवी, बी.आर.राजपूत, टी.एस.वाघ यांनी परिश्रम घेतले.