साई कलारत्न समाज भूषण पुरस्काराने रमेश खंडारे सन्मानित Ramesh Khandare honored with Sai Kalaratna Samaj Bhushan Award

Ramesh Khandare honored with Sai Kalaratna Samaj Bhushan Award

बुलढाणा न्यूजः शिर्डी येथील ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन या संस्थांच्या वतीने साप्ताहिक स्वाभिमानी बुलढाणाचे संपादक  तथा कथाकार, कवी, साहित्यिक व समाजसेवेचा वसा घेतलेले रमेश खंडारे सर साखळी बुद्रुक  यांना  साहित्य क्षेत्रातील व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय स्तरावरील ओम साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार शिर्डी येथे शुक्रवार, 3 मे 2024 रोजी सिद्ध संकल्प लॉन्स साकुरी अहमदनगर रोड येथे पुरस्कार सोहळा वितरीत करण्यात आला.
        या पुरस्कार सोहळ्यास पुरस्कार समितीचे अध्यक्ष सुदाम संसारे यांचे वाढदिवसाचे निमित्ताने त्यांचे हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून सिने कलांवत व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे समाजसेवक पुरस्कारर्थी  होते. सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत संगमनेरचे बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक श्री.किशोर कानडा, लोणी प्रवरानगर येथील समाजभूषण उत्तमराव घोंगरे पाटील, नामांकित मॉडेल सिने अभिनेत्री सावी वासनिक नागपूर येथील चित्रपट क्षेत्रातील निर्माता श्री.विनायकराव खांडवीलकर ,  नामवंत सीने कलाकार व संस्थेचे पदाधिकारी यांचे हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. रमेश खंडारे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें