बुलढाणाः येथील से.नि.गटविकास अधिकारी शिवाजी गवई व त्यांच्या पुर्णांगीनी सुनिताताई गवई परिवाराने विदर्भ हाउसिंग सोसायटी बुलडाणा येथील अॅड. दिनेश गवई यांच्या वनश्री बंगल्यात वरच्या मजल्यावर धम्म कुटी दान दाते अॅड.दिनेश गवई व त्यांची पत्नी सुवर्ण दिनेश गवई यांनी धम्म कुटी बनवून दिली आहे.
बुलढाणा येथे श्रीलंकेचे भंते शांतीचित्त, भंते यश,भंते पूण, भंते जीवीत तेथे रोज परित्राणपाठ, बुध्द वंदन, संडेस्कूल, धम्मदेशना असे विविध बौध्द धार्मिक कार्यक्रम केले जातात अशा या पावण धम्म कूटीत जाऊन धम्मदाते शिवाजी गवई परिवाराने धम्म कूटीत राहत असलेल्या भंतेना सुरक्षीत खाण्याच्या वस्तू राहण्यासाठी एक फ्रीज खालील श्रध्दावान उपासक,उपासिकांच्या उपस्थीत समाजभूषण शाहीर डि.आर.इंगळे, सेनि.मुख्यध्यपक तथा बुलडाणा जिल्हा प्रवक्ता दि बुध्दीस्ट सोसायटी अॅाफ इंडीया निरंजन जाधव, शासनमान्य पत्ररकार संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाकार्यध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव, रापचे कामगार नेते गणेश झोटे, बुलडाणा वाहतूक निरिक्षक पद्दमाकर मगर, सेनि. डेपो मॅनेजर दिपक साळवे, सेनि.रापचे वाहतूक अधिक्षक चंद्रकांत झिने, सेनि.बँक मॅनेजर दानदाते विजय गजभिये,बुलडाणा वाहतूक नियंत्रक जितेंद्र साळवे, सेनि. इंजीनियर भास्करराव जाधव, एमएसईबीचे कामगार नेते तथा नालंदा सार्वजनीक वाचनालयाचे अध्यक्ष नामदेवराव (एन.आर.) वानखडे, मराठा सेवा मंडळाचे बुलडाणा तालुखाध्यक्ष उद्दोजक संजय चितळे, रापचे सेनि. सहाय्यक वाहतूक अधिकारी आत्माराम चौतमोल, विलास खिल्लारे, भारतीय बौध्द माहासभेच्या महीलाध्यक्षा छायाताई जाधव, सेनि.शिक्षण विस्तार अधिकारी विमल जाधव, विजयालक्ष्मी वाघमारे, आरपीआयच्या महीलाध्यक्षा आशाताई वानखडे, जयश्री जितेंद्र साळवे, सुनिताताई शिवाजी गवई, सुनंदा गणेश झोटे, सेनि. मुख्यध्यापीका सुभद्राताई जाधव इतर उपासक, उपासिका ह्यांच्या उपस्थीतीत फ्रीज दान दिले.