राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 2 वाहनासह 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

* आचारसंहिता कालावधी 70 गुन्हे नोंद * उत्पादन शुल्कचे चेकपोस्ट

बुलढाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. यात 70 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 68 वारस गुन्हे आणि 69 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत 2 वाहनासह 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 8 lakh 13 thousand rupees along with 2 vehicles seized in state excise duty action या गुन्ह्यामध्ये देशी मद्य 303.30 लिटर, विदेशी मद्य 27 लिटर, रसायन सडवा 11 हजार 265 लिटर, हातभट्टी 683 लिटर, बिअर 7.8 लिटर पकडण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या खामगावच्या पथकाने मध्यप्रदेश सीमेला 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमापूर, ता. जळगाव जामोद येथे 3 गुन्हे नोंदवून 23 हजार 45 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निवडणुकीच्या अनुषंगाने सीमा तपासणी नाक्यावर निमखेडी व हनवतखेड, ता. जळगाव जामोद, तसेच चिखली-जाफ्राबाद रोडवर भोकर येथे तात्पुरते चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग, तसेच विविध जिल्ह्यात जाणार्‍या ट्रॅव्हल्सची भरारी पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.राज्य उत्पादन शुल्कला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 11 कोटी 12 लाखांचे महसुली उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाने 97 टक्के उद्दीष्ट प्राप्त करीत 10 कोटी 80 लाख रुपयांचा महसूल गोळा केला.

बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास येथे करा संपर्क

आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री अथवा बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉटसप नंबर 8422001133 किंवा  excisesuvidha.mahaonline.gov.in पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी. तसेच जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें