बुलढाणा न्यूज – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची विस्तारित जिल्हा बैठक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष आंबेकर यांच्या अध्यक्षतेत आज शनिवार,दि.30 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता , चिखली रोडवरील वीज कामगार पतसंस्थेच्या सभागृहात (राजश्री शाहू पतसंस्थेच्या समोर) बुलढाणा येथे आयोजन करण्यात आली आहे.
या विस्तारित जिल्हा बैठकिला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा.माधव बावगे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकिला जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष अध्यक्ष भाई प्रदिप हिवाळे, प्रधान सचिव पंजाबराव गायकवाड, अरविंद शिंगाडे, सुरेश साबळे, प्रा.रविंद्र साळवे, अनिल दातीर, निलेश बंगाळे, प्रा.कि.वा.वाघ, कल्पना माने, डॉ.मंजुश्री खोब्रागडे, अशोक काकडे, सत्य कुटे, शशिकांत जाधव, शशिकांत इंगळे, दिलीप गवई, सुधाकर धुरंधर, ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे.