शाळा बंद आंदोलनाला यश, दोन शिक्षकाची नियुक्ती

बबन फेपाळे
        रुईखेड मायंबाः जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा रुईखेड मायंबा ता.बुलढाणा या शाळेत शिक्षक नसल्यामुळे, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , ग्रामपंचायत सदस्य व पालक यांनी कुलुप बंद आंदोलन केले होते. दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षण विभाग बुलढाणा यांच्या वतीने गट शिक्षणाधिकारी नेटके मॅडम यांना शाळेवर पाठवण्यात आले व शाळेला दोन शिक्षक देण्यात आले.


        या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल फेपाळे यांच्या हस्ते शाळेचे कुलुप उघडण्यात आले व उद्यापासून नियमितपणे शाळा सुरू होईल या प्रसंगी उपस्थिती मध्ये सरपंच सौ.सुरेखा अनिल फेपाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर सोळंके, सदस्य डॉ.साहेबराव सोनुने, सारंग उमरकर, अंबादास साळवे, विष्णू म्हस्के, अमोल फोलाने, रवी गिरी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-पालक व शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें