कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, सचिव गोपाल निळकंठ यांचा समावेश
बुलढाणा- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक उत्सव समिती 2024 च्या कार्यकारिणीची बैठक बुलढाणा येथील हॉटेल गुरुकृपा येथे शनिवार, दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आशिष राजाराम लहासे, कार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत बगाडे, सचिवपदी गोपाल शेषराव नीलकंठ यांची तर महिला अध्यक्षपदी सारिका कैलास चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीचे प्रास्ताविक इंजि.सुरेश चौधरी यांनी केले. त्यानंतर सर्वानुमते कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी जयंती निमित्त घेण्यात येणार्या कार्यक्रमाची रुपरेषा नवीन अध्यक्ष आशिष लहासे व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी संयुक्त पणे केली. यंदाच्या जयंतीत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी अध्यक्ष बाळासाहेब गिर्हे यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले. नवीन कार्यकारिणीसह समितीची बैठक येत्या गुरुवार, दि.29 फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी विठ्ठल पंढरी जाधव, राजेश प्रल्हाद मोहळे, अनंता एकनाथ लहासे, प्रदीप प्रल्हाद डांगे, विवेक त्रंबक गिरे, मनोज सुपडा पवार , गोपाल शेषराव निळकंठ, विशाल दिगंबर सुरूशे, उमेश विष्णू सातव, वैभव दिलीप इंगळे, सुनील आनंदा गोरे, पवन शेषराव सोनारे, शंकर माधव राऊत, रमेश उबाळे, महेश जतकर, मनोज जाधव, रसाळ साहेब, इंजिनियर सुरेश प्रल्हाद चौधरी, त्रंबक भराड, श्रुती चौधरी सारिका कैलास चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी कोषाध्यक्ष वैभव इंगळे, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, महेश जतकर, विधी सल्लागार अॅड विशाल मारोडकर, अॅड शरद राखोंडे, प्रसिध्दी प्रमुख म्हणुन हर्षनंदन वाघ व पवन सोनारे यांची निवड करण्यात आली.