दोन रिक्त जागेवरील शिक्षकासाठी दिले होते निवेदन
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक बढतीने बदलून गेले होते रिक्त जागेवर दोन शिक्षक मुलांचे शैक्षणिक नुकसान बघता शिक्षक नियुक्तीसाठी शनिवार, दि.24 फेब्रुवारी रोजी दिले होते. बुलडाणा जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन त्यानुसार आज दि.24 फेब्रुवारी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले.
याबाबत सविस्तर माहिती वृत्त असे की, भाषा शिक्षक दि.15 डिसेंबर 2023 पासून कार्यमुक्त झाले होते. आज दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी 2 महिने 9 दिवस झाले आहेत.
तरी सुध्दा जि.प.शाळेला अद्यापही शिक्षक मिळाले नाही. शाळेला शिक्षक मिळावे म्हणून मागणी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप शिंदे व सदस्य डॉ.साहेबराव सोनुने जिल्हा परिषद, पंचायत समिती, बि.आर.सी व केंद्र प्रमुख यांना 5 ते 6 वेळेस भेटले असता त्यांनी 2 ते 3 दिवसात शिक्षक देतो असे उडवा उडवीचे उत्तरे दिले. म्हणून दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख या सर्वांना लेखी निवेदन देण्यात आले. व दि.24 फेब्रुवारी 2024 पर्यंत जर आम्हाला दोन शिक्षक मिळाले नाही. तर आम्ही दिनांक 24 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करणार आहोत, असा इशारा दिला असता. तरीसुध्दा आम्हाला शिक्षक मिळाले नाही. त्यामुळे नाइलाजाने आम्हाला आज शाळेला कुलुप लावण्यास भाग पाडले.
कुलुप बंद आंदोलन करते वेळी सरपंच अनिलभाऊ फेपाळे, उपसरपंच, सिद्धार्थ मगर, पोलीस पाटील समाधान उगले, लोकमत पत्रकार बबनराव फेपाळे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर सोळंके, सदस्य डॉ.साहेबराव सोनुने, विलास उगले, संदीप उगले, सारंगधर उंबरकर, अमोल फोलाने, अंबादास साळवे, रवि गिरी, विष्णू म्हस्के, शिवाजी नपते, सुनिल रामेकर, सांडू डुकरे, कौतीकराव उगले, गंजीधार उगले, शरद उगले, अनिल किलबिले यांच्यासह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. जो पर्यंत जि.प.शाळेला शिक्षक मिळणार नाही तो पर्यंत शाळा बंद आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकरत्यांनि पवित्रा घेतला ….
शाळा बंद आंदोलनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस शासन जबाबदार असणार.
– संदीप शिंदे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रुईखेड मायांबाआम्हाला दोन महिन्यापासून भाषेचे शिक्षक नसल्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन आम्हाला त्वरित शिक्षक उपलब्ध करून द्यावा. . नितेश सिद्धेश्वर सोळंके
विद्यार्थी रुईखेड मायंबा.