बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी राज्य गीत सादर करण्यात आले.