बुलढाणा न्यूज- भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी, सामाजिक आणि धम्म चळवळीत सक्रिय असलेले नांद्राकोळी येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान जाधव यांची भारतीय बौद्ध महासभेच्या बुलढाणा जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली.
सामाजिक आणि धम्म कार्याची दखल घेऊन सदर नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश डवरे सर यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केली. राजरत्न आंबेडकर यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र समाधान जाधव यांना देत पुढील धम्म वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जाधव यांनी धम्म चळवळ ही अधिक गतिमान करणार असल्याचे सांगितले.