मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत दहिद बुद्रुक शाळेत आरोग्य शिबीर संपन्न

      बुलढाणा – दहिद बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक आयएसओ शाळा येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत आरोग्य शिबीर घेण्यात आले.

      या शिबिरात डॉ.आर.ओ.धानुका यांनी लठ्ठपणा, मधुमेह, नेत्ररोग इत्यादी आजराबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्याची तपासणी केली. आरोग्य सेविका जेऊघाले मॅडम व वाघ मॅडम यांनी किशोर वयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाचे समुपदेशन केले. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थिनींची सिकलसेल आजाराची चाचणी करण्यात आली. शिबिरात मुख्याध्यापक  आत्माराम गायकवाड, सहाय्यक शिक्षक गणेश मुळे, जितेंद्र पालकर, राजेंद्र गवई, आशा खेत्रे, सुनंदा गायकवाड, कावेरी जाधव, पल्लवी खरात व जयश्री जाधव यांची सुध्दा आरोग्य तपासणी करण्यात आली.

        सर्वांची बीपी आणि शुगर चेक अप करण्यात आले. या शिबिरास आशाताई, शाळा व्यवस्थापन समिती यांची उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापकआत्माराम गायकवाड यांनी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें