बुलढाणा न्यूज
नागपूर – प्रादेशिक विद्युत मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर द्वारा आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा 2, 3, 4 फेब्रुवारी रोजी रा.तु.म.नागपूर विद्यापीठ क्रिडांगण अमरावती रोड लॉज कॉलेज चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यरत देवानंद ताठे यांनी 100 मिटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम तर 200 मिटर मध्ये द्वितीय क्रमांक पटाविला आहे.
या स्पर्धाचे उदघाटन शासकीय विज्ञान संस्था नागपूरचे संचालक डॉ.जयराम
खोब्रागडे यांच्याहस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र टाईम्स, नागपूरचे श्रीपाद अपराजित तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सा.बां.प्रादेशिक विद्युत मंडळ, नागपूरचे अधिक्षक अभियंता हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. तर विशेष अतिथी म्हणून क्रीडा व शारीरिक शिक्षणचे विभाग प्रमुख डॉ.माधव मार्डीकर, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ माजी कर्णधार गुरुदास राऊत यांची उपस्थिती लाभली होती. स्वागतोत्सुक म्हणून सा.बां.विद्युत विभाग, नागपूरचे कार्यकारी अभियंता विद्युत मनिष पाटील यांची उपस्थित होती.