बुलढाणा – येत्या सोमवार, दि.22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथे प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्त केशवनगरातल हनुमान मंदिराच्या वतीने 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात शहरातील केशवनगर मधील हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 10.30 वाजे दरम्यान शोभायात्रा, सकाळी 10.30 ते 12 वाजेदरम्यान रामनाम जप, कीर्तन, दुपारी 12.15 ते 1 वाजे दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण तसेच प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री मंदार बाहेकर, माजी नगरसेविका सरला बाहेकर यांनी केले आहे.