चोंडी लघु पाटबंधारे तलावावर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नोंदणीचे प्रस्ताव आमंत्रित
बुलढाणा न्यूज – कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या 3 जुलै 2019 च्या शासन निर्णयान्वये शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील चौंढी तलाव हा कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, बुलढाणा या कार्यालयाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झालेला आहे.
हा तलाव जलाशय परिसरातील स्थानिक लोकांना, प्रकल्पग्रस्त, मागासवर्गीय व महिला यांना संधी मिळण्याच्या दृष्टीने चौंडी (143.37 हेक्टर) लघु पाटबंधारे तलावावर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणी करण्याचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलढाणा यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), सु.ग.गावडे, यांनी केले आहे.