Orange day celebration for toddlers at Rashtramata Jijau English School
चिखली – येथील राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ऑरेंज डे उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल प्राचार्य दीपा वाघ, उपाध्यक्ष रीता देवकर यांची तर प्रमुख पाहुणे कोमल देशमुख, शुभांगी खरात, वर्ग शिक्षिका नेहा कुलकर्णी, साधना इटे उपस्थित होत्या.
यावेळी शाळेतील के.जी. 1 विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. नर्सरी ते के.जी. दोनच्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑरेंज डे ची वेशभूषिका सादर केली. तसेच जयश्री सपकाळ यांनी ऑरेंज डे विषयी भाषण दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन शितल उबाळे यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच शाळेचे अध्यक्ष पंडितदादा देशमुख, उपाध्यक्ष किशोरदादा दहिवाळ, सचिव कमल किशोर लांडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.