बुलढाणा न्यूज- सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन दिनानिमित्त बुलढाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सैनिक मंगल कार्यालयात संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर हे होत. तर कर्नल सुहास जतकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रुपाली सरोदे, तहसीलदार गिरीष जोशी, भूषण पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्ह्यातील शहिदांच्या कुटूंबीयांचा सन्मान करण्यात आला तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोदे रुपाली सरोदे यांनी केले तर कर्नल सुहास जतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अपर जिल्हाधिकारी श्री. विंचनकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगुन डोंगरदिवे व प्रतिमा खंडागळे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक परिवार व एनसीसी छात्र उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुनिल उबरहंडे यांनी केले.