अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबाला राज्य सरकारने एक कोटी रुपयांची मदत द्यावी: विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार

     बुलढाणा न्यूज- जिल्ह्यातील अग्निवीर शहीद जवान अक्षय गवते यांच्या कुटुंबाला गुरुवार, दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी अक्षयचे आई-वडील व बहिणीची सांत्वन पर भेट घेतली. तसेच गवते कुटुंबाशी चर्चा केली अग्निवीर अक्षयच्या कुटुंबाला पंजाब सरकारने अग्निवीर याला पंजाब सरकारने त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये मदत दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने अक्षय गवते यांच्या कुटुंबाला फक्त 10 लाख रुपये मदत दिली आहे.

           आत्महत्या करणार्‍या अग्निवीरला पंजाब सरकार एक कोटी रुपये देते. परंतु सियाचीनमध्ये आपले कर्तव्य बजावत असलेला अग्निवीर अक्षय गवते याला फक्त तोडकी 10 लाख रुपये मदत घेऊन राज्य सरकारने अक्षयच्या कुटुंबाची थट्टा केली आहे, राज्य सरकारने पक्षाच्या कुटुंबाला पंजाब सरकार प्रमाणेच 1 कोटी रुपये मदत द्यावी, अशी मागणी विजय वड्डेटीवार नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारला मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अक्षयच्या बहिणीला राज्य सरकारने शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी अक्षय गवते यांच्या आई-वडिलांनी केली आहे. अक्षय हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

            विजय वड्डेटीवार यांच्यासोबत बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय राठोड, सौ.जयश्रीताई शेळके, श्याम उमाळकर, कुणाल बोंद्रे, बुलढाणा सैनिक विभागाचे अधिकारी उबरहंडे, बुलढाणा उपविभागीय अधिकारी जाधव, मंडळ अधिकारी पिंपळे, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी बुलडाणा येथे कुक्कुट आणि पशुपालन प्रशिक्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें