सहा वर्षीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण
Not taking your complaint my duty is over, station diary officer suspended
तुमची तक्रार घेत नाही माझी ड्युटी संपली, स्टेशन डायरी अंमलदार निलंबित
बुलढाणा न्यूज – बुलढाणा जिल्हयातील जळगांव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथे रविवार, दि.19 नोव्हेबर रोजी सहा वर्षीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता. या दरम्यान पोलीस स्टेशनला डायरी अंमलदार हे हजर असतांना त्यांनी कामात कसुर केल्याच्या कारणावरुन तसेच तक्रारदार यांना मी आता तुमची तक्रार घेत नाही, माझी ड्युटी संपली आहे, असे म्हणून तक्रार घेतली नाही. यामुळे आरोपी गावांतून पळून गेला असे तक्रारदारांनी सांगितले. यावरुन स्टेशन डायरी अंमलदार राठोड यांना शासकीय सेवेतून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निलंबित केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगांव जामोद पोलीस स्टेशन येथे रविवार, दि.19 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनला स्टेशन डायरी अंमलदार म्हणुन ग्यानसिंग राठोड हे कामावर हजर होते. यावेळी तक्रारदार हया त्यांची सहा वर्षीय मुलगी व सासरे यांचेसह पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले असता त्यांची तक्रार होती की, आम्ही शेतमजुरी करीता गेली शेतात गेलो होतो व आमच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने माझी दोन्ही मुल हे त्यांचे परिवारासह घरीच होते. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास मोठा मुलगा याने फोनव्दारे माहिती दिली की, सहा वर्षीय मुलगी घरांचे बाहेर खेळायला गेली होती. याच दरम्यान थोडया वेळाने रडत रडत ती घरी आली. यावेळी तिने तिच्या आईला सांगितले की, माझी सु करण्याची जागा खुप दुखत आहे. यामुळे तिच्या आईने घडलेला प्रकाराबाबत सविस्तर अल्पवयीन मुलीस विचार असता तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. यावरुन मी व माझी पत्नी दुपारी एक वाजता शेतातुन घरी आलो माझी पत्नी, मी, सुन व माझी नात असे एक ते दिड वाजेच्या सुमारास जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो असता पोलीस स्टेशनला हजर असलेले साहेब त्यांचे नांव मला माहिती नाही.
त्यांना सांगितले की, मी आता तुमचा रिपोर्ट घेत नाही, माझी डयुटी संपली आहे. असे म्हणुन त्यांनी आम्हा सर्वांना पोलीस स्टेशनबाहेर काढले व तक्रार घेतली नाही, त्यामुळे तुम्हीं त्याचा रिपोर्ट वेळेवर न झाल्याने त्यांचे अल्पवयीन नातीसोबत बलत्कार करणारा आरोपी विठ्ठल दामोधर हा गांवातुन पळुन गेला असे त्यांनी त्यांचे जबाबात सांगितले आहे. यावरुन प्रकरणांचे गांर्भीय लक्षात न घेता रिपोर्ट घेण्यास बेजबाबदार कृत्यामुळे आरोपीला फरार होण्याची संधी मिळाली. या वरुन पोलीस अमंलदार पोहेकॉ ग्यानसिंग राठोड यांनी गैरवर्तनाच्या गंभीर बाबीमुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अंमलदार पोहेकॉ ग्यानसिंग राठोड यांचे निलंबन कालावधीतील पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे ठेवण्यात येत असुन त्यांनी दररोज गणवेशात हजेरी द्यावी, निलंबन कालावधीत बुलडाणा पोलीस अधिक्षक यांची पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये असे आदेशात नमूद केले.