Narco test and CBI inquiry of Bhandarpal along with Buldhana district surgeon
मनसेचे तालुका प्रमुख अमोल रिंढे पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
बुलढाणा न्यूज – जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना काळात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार होत आहे. या प्रकरणी सत्य शोधण्यासाठी सीबीआय चौकशी करावी तसेच पूर्वीच्या तिघांही जिल्हा शल्य चिकित्सकांची नार्को टेस्ट करण्यात यावी तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक दुष्काळ जाहीर करण्यात यावा व जिल्ह्यातील पर्यटनाला चालना द्यावी, सोयाबीन व कापसाला वाढीव दर द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन मनसेचे तालुका प्रमुख अमोल रिंढे पाटील यांनी बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले. हे निवेदन गुरुवार, दि.23 नोव्हेंबर 2023 रोजी मनसेच्या वतीने ना. दिलीप वळसे पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले आहे.
कोरोना महामारीकाळात बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले होतं. जेव्हा लोक कोरोना महामारीने मृत्युच्या दाढेत होते. तेव्हा जिल्हा रुग्णालय प्रशासन मलीदा खाण्यात गुंतले होते. या काळातील तिन जिल्हा शल्य चिकित्सक येवून गेले. तिघांनीही मोठा भ्रष्टचार केला हा भ्रष्टाचार 300 कोटीचा असल्याचा मुद्दा येथील लोकप्रतिनिधींनी सुध्दा उचलला आहे. याचे सत्य शोधण्यासाठी या काळातील तिनही जिल्हा शल्य चिकित्सकांची नार्को टेस्ट करावी व भ्रष्ट्राचाराची सीबीआय चौकशी करुन दोषी भांडारपाल प्रकाश बोथे व लेखाधिकारी अमरावती रविंद्र वानखेड, जिल्हा चिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.नितीन तडस तसेच इतरांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी मनसेचे तालुका प्रमुख अमोल रिंढे पाटील यांनी पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यंदा बुलढाणा जिल्हयातील शेतकरी संकटात आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हयातील सोयाबीन – कापुस या पिकांचा उतारा घटला आहे. शेतकर्यांना दिलसा देण्यासाठी सोयाबीनला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल व कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल भावा द्यावा. बुलढाणा जिल्ह्यात सार्वत्रिक दृष्काळ आहे. मात्र बुलढाणा व लोणार दोनच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आले आहे. दुष्काळीस्थिती पाहता बुलढाणा जिल्ह्यात सार्वत्रीक दुष्काळ घोषित करणे गरजेचे आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 73 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती तुमच्या गावाचा समावेश आहे का पहा?