best news portal development company in india

रोडरोमिओंवर दामिनी पथकांकडून कारवाई; पाच चिडीमार पकडले

SHARE:

डोणगाव येथील बसस्थानकावर शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक परिसरात मुलींची छेड काढणार्‍या व टवाळखोरी करणार्‍या रोडरोमिओंवर दामिनी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेदरम्यान दामिनी पथकाने ५ चिडीमारांना रंगेहात पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करत, पालकांना बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, डोणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळी बसस्थानकावर मुख्य चौकांमध्ये टवाळखोर मुलांचा सुळसुळाट वाढला होता.

या रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढली जात होत्या याची गंभीर दखल उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांनी घेत दामिनी पथकाने परिसरात गुप्तपणे गस्त घालण्यास सुरुवात केली. शुक्रवार, दि. १७ जूलै २०२६ ला उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक दामिनी पथक हे डोणगाव बसस्थानकावर आले पथ प्रमुख पि. एस. आय.द्रोपदी साळवे, कॉन्स्टेबल पल्लवी मुळे चालक पहारे तसेच डोणगाव पोलीस स्टेशनचे पि. एस. आय. अजमिरे वाहतूक पोलीस हर्ष सहगल या पथकाने संशयास्पदरीत्या फिरणार्‍या आणि मुलींना त्रास देणार्‍या ५ तरुणांना पथकाने ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली व त्यांना कायद्याचा हिसका दाखवत पुन्हा असे कृत्य न करण्याची कडक समज देण्यात आली. केवळ समज देऊन न थांबता, पोलिसांनी संबंधित मुलांच्या पालकांना तात्काळ पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मुलांच्या या कृत्याची माहिती पालकांना देऊन त्यांच्यासमोरच मुलांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. भविष्यात पुन्हा अशी तक्रार आल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा देऊन या पाचही जणांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें