स्थितप्रज्ञ गुरुनानक देवजी
Shitaprajna Guru Nanak Devji
नानक या नावाचा अर्थ आहे, जो एकाग्र आहे, एक देव पाहतो आणि त्यावर विश्वास ठेवतो आणि द्वैत पाहत नाही . गुरुनानकदेवजी यांच्या संदर्भात एक अद्भुत घटना घडली जी अनाकलनीय होती, ती विशद करणे तेवढेच महत्वाचे असल्यामुळे ती इथे उद्रगृत करणे गरजेचे आहे जेणे करुन जनसामान्यांना त्याचा बोध घेता येईल तर ती घटना येणे प्रमाणे – गुरुनानकदेवजी जगाचा उध्दार करीत भाई बाला-मरदाना सोबत अरब देशात पोहचले. तेथील बादशाहा लाजबरद खूप जुल्मी होता. भारतातील कोणीही तेथे गेला तर तो त्याची मान कापत असे. हे पाहून लोक खूप दु:खी व्हायचे तेव्हा त्यांनी देवाची आराधना केली. त्यांची प्रार्थना देवाने ऐकली त्यामुळे गुरुनानकांनी आकाशवाणीव्दारे निरोप पाठवला की, मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. तुम्हाला हा खलीता (चोला) पाठवित आहे. तो घालून तुम्ही अरब देशात जा व तेथील लोकांना सदगुणांचा उपदेश द्या व त्यांना परमेश्वरासोबत जोडा. तो चोला गुरुजींनी घातला ज्यावर तुर्की, अरबी, फारसी व हिंन्दी या भाषामध्ये ईश्वराची आद्य:अक्षरे लिहीली होती.
गुरुनानकदेवजी नगराच्या बाहेर बसले असतांना तेव्हा तेथील लोक लाजवरद बादशाहाला म्हणाले, महाराज ! दरबाराच्या बाहेर एक संत बसला आहे, त्याच्या गळयात चोला आहे व त्यावर कुराण शरीफचे 30 पाने लिहिले आहेत. तेव्हा बादशाहा वजिराला म्हणाला, बाहेर जाऊन त्या संताच्या गळयातील चोला काढून आणा. वजीर गुरुजीं जवळ गेला व म्हणाला, हे फकीरजी तुमच्या गळयातील हा खलीता मला द्या, गुरुजी एक ही शब्द न बोलता शांत राहिले. वजीराच्या आज्ञेचे पालन करत नोकरांनी तो चोला गुरुजींच्या अंगातून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो चोला काही केल्या निघत नव्हता. सगळयांनी ताकद लावली पण तो चोला निघाला नाही. शेवटी थकून ते दरबारात गेलेत त्यांनी घडलेला प्रकार बादशाहाला सांगितला. त्यावर बादशाहाने क्रोधित होऊन आदेश दिला की, तुम्ही त्या फकिराला समुद्रात बुडवून द्या. नोकरांनी गुरुजींना आदराने समुद्रात सोडल्यावर गुरुजींवर कसल्याही प्रकारचा परिणाम झाला नव्हता. त्यामुळे सर्व लोक अचंभित झाले होते.
जेव्हा बादशाहाने ही गोष्ट ऐकली, तेव्हा तर तो आणखी क्रोधीत झाला व त्याने आदेश दिला की, त्या फकिराला आगीत जाळून टाका. पण गुरुजींना आग्निची झळही पोहचली नाही. तेव्हा हतबल होऊन बादशाहा रागाने म्हणाला, हा फकीर निश्चितच जादुगर दिसतो किंवा त्याला दैवशक्ति प्राप्त असावी. आता असे करा की, कोणत्याही उंच पहाडावरुन त्याला धक्का देऊन खाली पाडा व संपवा. वजिराने गुरुजींना उंच पहाडावरुन धक्का देऊन खाली पाडले पण आश्चर्य असे की, सर्व लोकांनी गुरुजींना लगेच फुलांच्या मंचावर बसलेले पाहिले. हे चमत्कारी उत्तर ऐकून बादशाहा वजिराला म्हणाला, हा साधू निश्चितच खूप मोठा किमयागार असावा असे वाटते त्याची खात्री झाल्यावर त्यांनी आदेश दिला की, एक मोठा खड्डा खोदून त्याला आत पुरवा व वरुन दगड माती टाकून त्याला दाबून टाका. बादशाहाने सांगीतल्याप्रमाणे वजीराने तसेच केले, खड्डयावर हजारो मण दगड ठेवून सगळे निश्चित होऊन घराकडे निघुन गेलेत.

जेव्हा दूसऱ्या दिवशी लोक त्या स्थानावर गेले तर गुरुजी त्यांना त्याच जागेवर बसलेले दिसले. गुरुबाणीत ही हेच सांगितले आहे की, ‘जिस तू राखौ तिस कोन मारै’ “देवतारी त्याला कोण मारी” जेव्हा बादशाहाने ही गोष्ट ऐकली, तेव्हा तो वजिराला म्हणाला, या फकिराला माझ्या समोर आणा व त्यांची मान छाटून वेगळी करा, तोही प्रकार करुन बघीतला परंतू सर्व व्यर्थ. त्यानंतर राजाने गुरुजींना सुळावर चढवण्याचा आदेश दिला, तेव्हा ते सुळे हिरवेगार झाले. त्यामुळे तर आता सगळे लोक हैराण झाले. इकडे बादशाहाला दरबारातील बुध्दीमान लोक म्हणाले की, हा फकीर तर कोणी महापूरुष दिसत आहे किंवा असे वाटते की देवाने फकिराचे रुप धारण केले असावे, हे कळायला मार्ग सुचत नव्हता. मन सुन्न बधीर झाले. कारण फकीरावर कसल्याही प्रकारचा आघात होत नव्हता, त्यामुळे सर्व बैचेन झाले होते.
इकडे भाई बाला व मरदाना गुरुजींना प्रार्थना करतात की, हे गुरुदेव ! हा राजा अत्यंत पापी आहे. याला नक्की दंड दिला पाहिजे. गुरुजी शांतपणे म्हणाले, आम्हाला तर त्या देवाची आज्ञा आहे की, आम्ही विश्वातील लोकांना सत्यमार्गावर चालणे शिकवावे. ज्याची देव रक्षा करतो, त्याला कोणीही मारु शकत नाही. जो मनुष्य जसे कर्म करतो, त्याचे फळ त्याला देवच देत असतो. आमचे कोणाशीही वैर-विरोध नाही, जो जसे करेल, तो तसे भरेल. जशी करणी, तशी भरणी या उक्तीपासुन कोणीही सुटु शकत नाही. बादशाहाला पश्चाताप झाला तो अनवाणी पायांनी गळयात कपडा टाकून तोंडात तिनका ठेवून गुरुजींच्या चरणाजवळ आला व म्हणला महाराज ! मी अधर्मी, पापी व खूप मोठा गून्हेगार आहे, म्हणून मला क्षमा करा. बादशाहा गुरुजींच्या चरणावर नतमस्तक झाला व हात जोडून म्हणू लागला. हे देव रुपी साधू तुम्ही मला व माझ्या देशाला क्षमा करा. जो कुविचार मनात माझ्या आला होता त्याऐवजी सद्विवेक मार्ग मला दाखवा अशी विनवनी करु लागला.
गुरुद्वारातील महान विद्वान कवी व गजलकार भाई नंदलालनी गुरुजींची स्तुती करत म्हटले आहे, ‘गुरुनानक आमद नाराइन सुरुपा, हुमाना निरंजन निरंकार रुपा’ अर्थ असा की देव स्वत: गुरुनानक यांचे रुप धारण करुन म्हणाले, हे बादशाहा आम्ही तुमच्यावर तेव्हा प्रसन्न होऊ, जेव्हा तुम्ही प्रण कराल की, यापुढे मी कधीही कोणत्याही मानवाला दु:खी करणार नाही जातिव्देष व पक्षपात सोडून सदैव न्याय करेल सदाचारानी राहील, जर तुम्ही प्रण करुनही जर असे वाईट काम करत राहाल तर लक्षात ठेवा, तुम्हाला खुप मोठा दंड दिला जाईल. पुन्हा कधीही तुमच्यावर दया करणार नाही, बादशाहा म्हणाले, हे गुरुदेव ! आता तर माझ्यात तिनका तोडायचे ही सामर्थ्य राहिले नाही. जशी आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे संपूर्ण आयुष्य आपल्या उपदेशाप्रमाणे वागेल. गुरुजी म्हणाले, त्या परमेश्वराचे नामस्मरण करा व आपल्या देशात लंगर करण्याची प्रथा सुरु करा. गरीबांची सेवा करा, पापाचा दुरुनच त्याग करा, सर्वांना न्याय द्या तेव्हा बादशाहाने गुरुजींच्या सर्व आज्ञेचे पालन करण्याचे प्रण केले व त्याच दिवसापासून बादशाहा गुरुजींचा शिष्य झाला. तेथील जनता ही गुरुनानकदेवजी महाराजांची शिष्य झाली. काही दिवस गुरुजी त्या बादशाहाचे पाहुणे म्हणून राहिले व नंतर पुढच्या प्रवासाला निघाले. अशा स्थितप्रज्ञ गुरुनानकदेवजींनी शिख संप्रदायाची स्थापना केली व प्रथम गुरु म्हणुन गुरुवाणीत नावलौकीक मिळविला.
गुरुनानक यांनी अनेक ठिकाणी संगत (धर्मशाळा) आणि पंगत (लंगर) सुरुवात केली. आजही संगत व पंगत मुळे गुरुनानकांचे अनुयायी प्रत्येक दिवशी एकत्र येतात आणि सबद-किर्तन करतात नानकदेव आपल्या गुरवाणीत म्हणतात की, ‘नानक उत्तम निच न कोई’ आपण ईश्वराच्या नजरेत सर्व समान आहोत कारण मानव जात एक आहे. तो खालच्या जातीचा, मी उच्च जातीचा हा भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जात-पात नष्ट करण्यासाठी त्यांनी जो गुरु (लंगर) चा नि शुल्क पायंडा पाडला तो वाखण्याजोगा आहे. आम्ही सर्व ईश्वरांची लेकरे आहोत हा अविभाव त्यांनी (लंगर) च्या रुपाने मग तो गरीब असो की श्रीमंत त्यांनी एकाच पंगतीमध्ये बसण्यास सर्वांना भाग पाडले. आजही ही प्रथा अखंड पणे गुरुद्वारामध्ये राबविली जाते या पासुन प्रत्येक मानवाने बोध घेतला पाहिजे. गुरूनानक यांनी कधीही ‘देवांच्या ट्रिनिटी’ वर विश्वास ठेवला नाही किंवा देव मानवी स्वरूपात जन्माला येऊ शकतो यावर विश्वास ठेवला नाही. शीख धर्मात त्यांनी हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा, जातीभेद, कर्मकांड यावर त्यांचा कधीच विश्वास नव्हता. त्यांचे शब्द श्री गुरु ग्रंथ साहिब, पवित्र शास्त्रात समाविष्ट आहेत.
मी मोठा तू छोटा हा भेद पाळला नाही, तेव्हाच ही जात-पात नष्ट होईल. असा आदर्श प्रत्येकांनी आपल्या अंगी जोपासला पाहिजे. कारण ‘आदि सचू, जुगादी सचू है भी, सचू नानक होसी भी सचू’ आपला दृढ विश्वास असायला पाहिजे की, संत साधनांचा सतनाम पाणी सच्चनाम ही आहे. सत्य हे सत्य आहे, जे असत्य होऊ शकत नाही. सत्याशिवाय काही नसुन संपूर्ण सत्य आहे, असेही देवजी म्हणतात. सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु कहा गया है. बाकी सर्व मिथ्या सर्व थोतांड आहे. दरवर्षी लोक रस्त्यावरून फटाके आणि मिरवणूक काढून गुरुनानक यांचा जन्म साजरा करतात. शीख मंदिरांमध्ये – गुरुद्वारा – शिखांचा पवित्र ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिब, मोठ्याने वाचला जातो. घरांमध्ये आणि कार्यालये, दुकाने अशा सार्वजनिक ठिकाणी मेणबत्त्या पेटवल्या जातात. शीख परंपरेत नानकजी जयंती Sikha parampareta nanakaji jayanti त्यांच्या पहिल्या शीख गुरूंच्या जन्माच्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा केला जातो. ज्यांनी शीख समुदायाला आकार देण्यात आणि मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . पर्यायाने गुरपूरब किंवा गुरुपुरब असे शब्दलेखन केले जाते. गुरूपुरव या दिवशी पहाटे लवकर गुरुद्वारात कार्यक्रम सुरू केले जातात. पहाटे सकाळच्या विशेष प्रार्थना गायल्या जातात. कथा आणि कीर्तन यांचे आयोजन केले जाते. लंगर भोजन व्यवस्था करण्यामागे सर्व समानता असा हेतू आहे. सर्वजाती जमातीचे लोक एकत्र येवुन येथे प्रसाद स्वीकारतात. संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केल्या जातात. लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात. मध्यरात्री जन्म उत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात. या सर्व प्रार्थना गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथातील आहेत.
शीख एक देव, निर्माता आणि सर्व मानवजातीच्या समानतेवर विश्वास ठेवतात. गुरूनानक यांनी शिखांना कौटुंबिक जीवन जगायला शिकवले आणि तीन पटीचे बोधवाक्य पाळले ज्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात आणि त्यामध्ये देवाशी जोडण्यास मदत झाली: नाम जपो – प्रार्थना करा आणि देवाचे स्मरण करा. किरत करो – प्रामाणिक जीवन जगा. देशातील जेवढे संत होऊन गेलेत त्यांनी तथागत भगवान बुध्दांनी सांगीतलेल्या मार्गाचा अवलंब केल्याचे आम्हाला आढळून येईल. कोणताही संत बघा, कित्येक वर्षापूवी तथागतांनी सांगीतलेल्या उपदेशाचा प्रचार या देशातील संतानी आपापल्या परिने केले हे नाकारुन चालणार नाही. भारतीय अध्यात्मिक शिक्षक जे शीख धर्माचे पहिले गुरू गुरुनानक होते, एकेश्वरवादी धर्म हिंदू आणि मुस्लिम प्रभाव एकत्र करतो. अशा सत्याचा मार्ग दाखविणाऱ्या महान सतिगुरु श्री गुरुनानकदेवजींचा जन्म कार्तिक पौर्णिमा आणि गुरुनानक जयंती दिनी 15 एप्रिल 1469 ला श्री नानकाना साहिब येथे आई तृप्ता देवी आणि वडील कालू खत्री यांच्या घरी झाला. ज्याला गुरुनानकचा प्रकाश उत्सव आणि गुरुनानकदेवजी जयंती असेही म्हणतात. एकता, श्रध्दा आणि प्रेमाचा संदेश देणारे शिख धर्माचे संस्थापक गुरुनानकददेव यांच्या 554 व्या जयंती निमित्त त्यांना शत: शत प्रणाम !
वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
सर्व शीख बांधवाना गुरुनानक जयंती च्या खूप खूप शुभेच्छा !
