पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या आजींचे निधन

Graduate Constituency MLA Dhiraj Lingade’s grandmother passed away

       बुलढाणा न्यूज – पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज रामभाऊ लिंगाडे यांच्या आजी तसेच माजी गृहराज्यमंत्री स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे यांच्या मातोश्री सुभद्राबाई बाबुरावजी लिंगाडे यांचे आज बुधवार, दि.15 नोव्हेंबर 2023 दुपारी 3 वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.

      मृत्यूसमयी त्यांचे वय 104 वर्ष इतके होते. त्यांच्या निधनाने लिंगाडे परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार,दि.16 नोव्हेंबर 2023 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांची अंतिम यात्रा आ.धिरज लिंगाडे यांच्या निवासस्थानातून सकाळी 10 वाजता खामगाव रोड वरील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल, यांची संबंधीतांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें