best news portal development company in india

काँग्रेसच्या आसूडची वेळ चुकली

SHARE:

काँग्रेसचे नियोजन शुन्य काम
राज्यातील नाराज नेत्यांचे शिष्टमंडळ येत्या ८ जून रोजी नवी दिल्लीत

अध्यक्षांचा पदभार अन् आसूडचा मेळ काँग्रेसला का जमला नाही?
बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागारच्या मैदानावर सभा व मोर्चा न घेता भरकटलेल्या पक्षांतर केलेल्या काँग्रेसची संख्या रोडावल्याने गर्दी  कमी होईल या भितीपोटी गर्दे वाचनालयाच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन गर्दे वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.   मोर्चात सहभागी होण्यासाठी भरमसाठ डिझेल पेट्रोल भरून शेकडो वाहने घेवून सहभागी झाली होती. त्यातून काँग्रेसच्या आसूडची वेळ काळ चुकली अशी भावना व्यक्त होत आहे. काँग्रेसचे हे आंदोलन म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार असल्याचे दिसून आले.

बुलढाणा न्यूज
बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात सोमवार, १ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात शेतकरी, विद्यार्थी बेरोजगारांच्या मागण्यावर आसूड मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा अ-यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाभरातील शेकडो वाहनात डिझेल पेट्रोल भरून मोर्चात सहभागी झाल्याने काँग्रेसच्या आसूड मोर्चात पेट्रोल डिझेल भरलेली वाहने मोर्चेकर्‍यांची मूळ मागणी भरकटून आसूड बनला ठिसूळ अशी प्रतिक्रीया बुलढाणेकर स्पष्ट बोलतांना दिसून आले. तसेच काँग्रेसच्या आसूडची वेळ देखील चुकली असल्याचे काँग्रेसच्या कार्येकर्त्यांमध्ये कुजबूज सुरु होती.

शेतकर्‍यांना ट्रॅक्टर द्वारे नागरणी करण्यासाठी डिझेल मिळत नाही असे असतांना मोर्चेकर्‍यांनी काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यःस्थितीत  जिल्हा प्रशासनाने बुलढाणा जिल्हयात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा असल्याचे काही दिवसांआधीच शासनाकडून सांगण्यात येत होते. तरी देखील अतीहुशार सल्लागारांनी हा सल्ला दिल्याचे समजते.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेले तसेच बुलढाणा विधानसभेचे आमदार म्हणून देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिनिधीत्व केलेले आहे. परंतु  त्यांच्या नेतृत्वातील हा पहिलाच मोर्चा असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात तसेच पेट्रोल डिझेल खतांची दरवाढ, नीट परीक्षा पेपरफुटी, वाढती महागाई या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काँग्रेसच्या आसूडची वेळ चुकली अन्  काँग्रेसचे नियोजन शुन्य काम यामुळे सपशेल हा आसूड मोर्चा  ठिसूळ दिसून आला.

 

बाराशे कचोर्‍यांची ऑर्डर होती म्हणे…

गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आसूड मोर्चा व नवनियुक्त अध्यक्षांचा पदभार स्विकारण्याचा समारंभा करता बाराशे कचोर्‍यांची ऑर्डर देण्यात आली होती. या कचोर्‍यांकरीता देखील कॉग्रेस प्रेमींनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत होते. तर काही जेष्ठ पत्रकारांनी आसूड मोर्चा नसून हासूड मोर्चा असल्याची खिल्ली उडविली हे विशेष!

महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार?

महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धती विरोधात पक्षातील नाराज नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती समोर आली. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धती विरोधात पक्षातील नाराज नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नाराज नेत्यांचे शिष्टमंडळ येत्या ८ जून रोजी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेणार असून, प्रदेशाध्यक्षपदात बदल करण्याची मागणी मांडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या शिष्टमंडळात काँग्रेसचे चार ते पाच विद्यमान आमदार तसेच काही ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. हे नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन राज्यातील संघटनात्मक परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडणार आहेत.

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें